शेकडो ब्रास गौण खनिज उत्खनन प्रकरणी सरपंचला क्लिनचीट
पातूर(Akola):- पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री ग्राम पंचायतचे (Gram Panchayat) सरपंच जहूर खान यांनी ८०० ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून सार्वजनिक रस्ता (public road) तयार केल्याचा आरोप उपसरपंच शे. राजिक शे. पिरण , सदस्य अरुण पजई ,माधुरी संदीप लांडे, रत्नप्रभा कृष्ण आप्पा डहाडे, आशाबाई गजानन उपर्वट, यांनी संबंधिताकडे केलेल्या तक्रारीतून केला होता. संबंधितांकडून कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात कार्यवाहीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र वार्ड क्रमांक एक मधील ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून नदीतील रुळीने रस्ता तयार केल्याचे निदर्शनात आले होते. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व बाबीची पडताळणी करून २० जून २०२३ रोजी पारित केलेल्या आदेशात सरपंचावर लावलेले शेकडो ब्रास गौण खनिज उत्खननाचे आरोप फेटाळले, मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला आव्हान देत सदर प्रकरण विरोधकांनी अमरावतीच्या (Amravati) विभागीय आयुक्त न्यायालयात दाखल केले, विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवून अपिलार्थी यांचे आरोप फेटाळल्याचे आदेश ३० एप्रिल २०२४ रोजी पारित केले आहे.
खेट्री सरपंचाच्या बाजूने आयुक्ताचा निकाल
वार्ड क्रमांक एक मधील ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून नदीतून रुळीने रस्ता तयार केला होता. राजकीय हेतूने माझ्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून माझ्या बाजूने आदेश पारित केला आहे. “सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही”.