प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले सूचक संकेत
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Akola Constituency Election) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी त्यांनी हॉटेल जलसा येथे अकोला जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे निर्देश देत पक्षाच्या कामकाजामध्ये सुधारणा न झाल्यास प्रसंगी (Akola Constituency Election) अकोला पश्चिम मतदार संघ मित्र पक्षांच्या वाट्याला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले. त्यांच्या या सूचक संकेतामुळे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या इच्छूकांच्या पायाखालीची वाळू सरकली आहे.
पक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याची महत्वपूर्ण सूचना
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची (Akola Constituency Election) आचारसंहिता येत्या १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे. त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी ताकदीने सुरूकेली आहे. सध्या अकोला पूर्व, मुर्तिजापूर, अकोट आणि अकोला पश्चिम मतदार संघावर भारतीय जनता पक्षाचे प्रालब्य असून, पाचपैकी चार विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याअनुषंगाने पुन्हा पाचही मतदार संघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे दौरे सुरू आहेत.
विधानसभा निवडणुक गांभीर्याने घेण्याचा इशारा अकोल्यातील पक्षाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, (Akola Constituency Election) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार तथा शिवसेना नेते संजय राऊत देखील अकोल्यात आले होते. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुर्तिजापूरात येऊन विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुकले. तर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेतेसुध्दा अकोल्यात येऊन त्यांनी अकोला पश्चिम मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे फार्म स्विकारले आहेत.
विधानराभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता येत्या १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे. त्याअनुषगाने राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षानी विधानसभा निवडणुकीची मोर्वेबाधणीताकदीने सुरु केली आहे.
अकोला पश्चिमसंदर्भात भाजपाकडून चाचपणी.मित्र पक्षांच्या आशा पल्लवित !
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अकोला पश्चिम मतदार संघ अदला-बदल होण्याचे संकेत दिल्याने भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गट व शिवसेना शिंदे गट या मित्र पक्षांच्च्त्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, महायुती अकोला पश्चिम मतदार संघबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दावेदारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले !
अकोला पश्चिम मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाकडून आठ ते दहा पदाधिकारी इच्छूक आहेत. त्यांच्यास्तरावर (Akola Constituency Election) विधानसभा निवडणुकीची तयारीसुध्दा त्यांनी प्रारंभ केली आहे. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आढावा बैठकीत अकोला पश्चिम मतदार संघ मित्र पक्षांच्या वाट्चाला जाण्याचे सूचक संकेत दिल्याने विधानसभा निवडणुकीसाठी गुंडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.