अकोला (Akola Crime) : डाबकी रोड पोलिसांच्या हद्दीत येणार्या बाळापूर नाकास्थित हॉटेल व्ही.एस. येथे ३० जानेवारी २०२५ रोजी लग्न समारंभादरम्यान चोरी झालेल्या पैसे व दागिन्यांचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. या (Akola Crime) प्रकरणात मध्यप्रदेशातील राजगढ येथील कडिया गावातील कुख्यात साँसी गँगचा हात असल्याचे उघड झाले आहे. या टोळीकडून एकूण ५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लग्न सोहळ्यात झालेल्या चोरीच्या घटनेनंतर, जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. हे पथक तब्बल १२ दिवस राजगढ, मध्यप्रदेश येथे तळ ठोकून तपास करत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरीचा मागोवा घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी त्यांच्या गावातून फरार झाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली असता, त्या (Akola Crime) ठिकाणी चोरीचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी केला कसून तपास
या (Akola Crime) कारवाईत अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक शंकर शेळके, सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलिस उपनिरीक्षक माजिदखान पठाण, सायबर तज्ज्ञ आशिष आमले आणि गोपाल ठोंबरे यांनी कसून शोध घेतला. पोलिसांनी तांत्रिक कुशलता आणि अथक परिश्रमाने चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
विविध गुन्ह्यांची केली उकल
डाबकी रोड पोलिस स्टेशन : लग्नात आलेल्या गिफ्ट्सची बॅग चोरी; ५ लाख रुपये, १५ ग्रॅम सोन्याची चेन, २ अंगठ्या आणि अॅपल मोबाइल चोरीला गेला होता.