Akola:- पातुर तालुक्याच्या एका गावातील मुलीचा विनयभंग (molestation) प्रकरणी चान्नी पोलिसांनी ६ जानेवारी रोजी दाखल गुन्हे विरोधात ८ जानेवारी रोजी आलेगावातील सर्व जाती धर्माचे हजारो महिला पुरुषांनी एकत्र येऊन माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा आणि कडकडीत बंद ठेऊन सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा व जाहीर निषेध
सदर प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे (Crime)तात्काळ रद्द करावे अशी मागणी आलेगाव ग्रामस्थ पुरुष महिला मंडळी यांच्याकडून करण्यात आली,पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यवसायिक अशोक जानकिराम काळदाते यांच्या विरुद्ध ६ जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीच्या बयाणा नुसार चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.सदर गुन्हा खोटा दखल करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. खोट्या दाखल गुन्हे विरोधात तीव्र मत व्यक्त करून पोलीस प्रशासनाने पुन्हा योग्य चौकशी करून गुन्हे तात्काळ रद्द करावे असे मत अनेक ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यकरत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.तसेच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या उपस्थिती मध्ये सदर मोर्चा व कडकडीत बंद शांततेत पार पडला.