अकोला लोकसभाआदर्श आचार संहितेचा भंग होत आसल्याची भीती
रिसोड (Washim) : मागील 16 मार्चपासुन (Election Commission) निवडणूक आयोगाने आगामी (LokSabha Election) लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहीता जाहीर केली आहे.रिसोड तालुक्यातील आता पर्यंत लोणी व निजापुर येथे (Code of Conduct) आचारसंहीता भंग प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत.परंतु मागील काही दिवसांपासून शासणाचे पगारदार नोकर खुलेआम राजकिय पक्षांचा प्रचार करून आपल्याच राजकिय पक्षाला मतदान करण्यासाठी पुढाकार घेतांनी खुलेआम फिरतांनी दिसत आहेत. यामध्ये काही शासकिय कर्मचारी राजकीय पक्षांचे टेट्स ठेवण्या पर्यंत मजल जात आहे. हा आदर्श आचारसंहीतेचा भंग नाही का ? आशा प्रकारचा सर्वसामान्य नागरिक प्रश्न करीत आहेत.
लोकसभा निवडणुकी (LokSabha Election) दरम्यान आदर्श आचारसंहीतेचे सर्वच स्थारातुन काटेकोरपणे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष करून शासकीय नोकरदार वर्गाने राजकिय प्रचारा पासुन चार हात दुरच राहणे फायद्याचे ठरते. परंतु (Akola LokSabha) अकोला लोकसभा मतदारसंघाचा विस्तार पाहाता. दररोज मतदान प्रचारासाठी उमेदवार येणे शक्य नाही. विशेषता उमेदवरांनी आता प्रचाराची संपूर्ण जबबादारी ही त्या त्या पक्षातील स्थानिकच्या प्रमुख नेत्यावर सोपविलेली आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षातील आजी-माजी राजकिय नेते हे वेवगळ्या संस्थांचे मालक किंवा प्रमुख आहेत.
अनेक राजकीय पक्षातील प्रमुख नेत्याकडे बहुतांश संस्था अनुदानीत आहेत. अर्थात शेकडो शासकीय पगारदार नोकरांचा भरना आहे. जो की शासणाचा पगारदार वर्गामध्ये येतो. हाच पगारदार नोकरवर्ग आपल्या संस्था चालकांची हुजरेगिरी करण्यासाठी (Washim Election) मतदारापर्यंत राजकिय प्रचार करीत आदर्श आचार संहितेचा भंग करीत आहे. तर अनेक राजकीय पुढा-यांनी आपल्या अनेक अनुदानीत संस्थे वरील कर्मचा-याकडे विशिष्ठ भागातील प्रचाराची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. आचारसंहीतेचा बडगा फक्त ग्रामीण भागातील नागरिका साठी उगारल्या जातो का ? हा यक्ष प्रश्न या (LokSabha Election) लोकसभा निवडणुकी दरम्यान उभा ठाकत आहे. या गंभीर प्रकाराकडे निवडुक अधिकारी कशा प्रकारे लक्ष देतात. याकडे तालुका वाशीयांचे लक्ष लागलेले आहे.