> स्वतंत्र संचालक आशिष चंदाराना यांचे आवाहन | कार्यपद्धतीत बदल करावे
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Akola) :- शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांना ( Electricity consumers ) उत्तम सेवा देण्यासाठी महावितरणमध्ये अनेक भरीव कामे होत आहेत. महावितरण कंपनीच्या ( Maha distribution company ) निर्मितीपासून आतापर्यंत कंपनीची उल्लेखनीय कामगीरी राहली आहे. परंतू आगामी काळात महावितरणला अधिक स्मार्ट आणि ग्राहकाभिमूख करण्यासाठी महावितरणमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनीही आपल्या कार्यपध्दतीने काळानुरूप बदल करावे, असे आवाहन एमएसईबी होल्डींग कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराना (Director Ashish Chandarana ) यांनी येथे केले. स्थानिक शुभकर्ता लॉन्स येथे महावितरण कंपनीच्या १९ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट, अनिल वाकोडे, सहाय्यक महाव्यवस्थापक मनिषकुमार भोपळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुख्य अभियंता पडळकर म्हणाले, परिमंडळातील विविध योजनांवर १०० टक्के काम करण्यात आले. शेतकऱ्यांना ( farmers ) दिवसा वीज पुरवठा ( Electricity supply ) करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सौर प्रकल्पाकरीता राज्यात सर्वप्रथम भू संपादनाचे काम अकोला परिमंडळात ( Akola circle ) झाले आहे. पायाभूत विकासाठी महत्वाच्या असलेली आरडीएसएस व तत्सम योजनांची कामेही परिमंडळात गतीने सुरू आहे. परंतू सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे, हे ओळखून महावितरण कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना घरोघर पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
> स्मार्ट मीटर संभ्रम दुर करण्यास प्रयत्न करावे
तर जनतेचा रोष होईल कमी- कछोट स्मार्ट मिटरमुळे वीज ग्राहकाना अचूक वीज बिलासोबत वीज वापराची माहिती मिळणार आहे. शिवाय ग्राहकांना आपल्यासोयीनुसार विजेचा वापर करता येणार आहे. स्मार्ट मिटर ही काळाची गरज आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांडून ग्राहकांचा स्मार्ट मीटरविषयी असेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावा, असे आवाहन प्रमुख अतिथी आशिष चंदाराणा यानी यावेळी केले. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट म्हणाले की, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील वीज ग्राहकांच्या संपर्कात राहिल्यास आपत्कालीन परिस्थितीत वीज ग्राहकांमधील महावितरणविषयी रोष कमी होऊन प्रसंगी त्यांचे सहकार्य मिळते आणि जनसामान्यात स्वतःची आणि महावितरणची प्रतिमा उंचावण्यास मदत होत असल्याचे त्यानी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण शेलकर तर संचालन व आभार प्रदर्शन अशोक पेटकर यांनी केले.