- शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाणीटंचाईमुळे होत आहे रुग्ण व नातेवाइकांचे हाल
अकोला (Akola ) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात (hospital) रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी, वार्डात आरओ (RO) मशीन लावली आहे. परंतु कित्येक दिवसापासून हे ‘आरओ’ मशीन बंद पडल्या आहेत. शासकीय सर्वोपचार (Governmental care) रुग्णालयात पाणीटंचाईमुळे रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहेत जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दररोज येणारे रुग्ण, आंतररुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण, रुग्णांसोबतचे नातेवाईक यांना पिण्याच्या पाण्यासाठी तपत्या उन्हात वणवण भटकती करावी लागत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत आणावे लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
रुग्णालयातील आरओ मशीन अनेक दिवसापासून बंद आहेत, या पाणी प्रकरणाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये (Dr Meenakshi Gajbhiye) हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. सर्वोपचार रुग्णालयांतील ‘आरओ’ मशिन त्वरित दुरुस्ती करून रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांनची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन (movement) छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते (Social workers) उमेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे केलेल्या तक्रारीद्वारा केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथ रुग्णसेवक समिर खान, अब्दुल कादर, सुरज खंडारे, सिध्दांत वानखडे, अमोल इंगोले आदी उपस्थित होते.