अकोला (Akola Police) : दहीहांडा पोलिस स्टेशनमधील दाखल झालेल्या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलिस शिपाई प्रफुल्ल जनार्धन दिंडोकार (३३) आणि दलाल शंकर जानराव तरोळे (६५) यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दहीहांडा पोलिस ठाण्यात सज्ञान न घेण्यायोग्य (एनसी) प्रकरण दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता प्रकरण मिटविण्यासाठी Akola Police) पोलिस शिपाइ दिंडोकार यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ८ हजार रुपयांवर आली.
याप्रकरणी ’एसीबी’ने तक्रारीची पडताळणी करून जाळे रचले. मंगळवारी सायंकाळी, तक्रारदाराच्या माध्यमातून ही रक्कम दिंडोकार यांच्या सांगण्यावरून दलाल शंकर तरोळे यांना दहीहांडा-दर्यापूर मार्गावरील हॉटेलजवळ देण्यात आली. त्याच वेळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ‘एसीबी’ने कारवाई करत तरोळे यांना ताब्यात घेतले आणि पोलिस कर्मचार्यास अटक केली. या (Akola Police) कारवाईसाठी एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या टीमने सापळा रचला होता. या सापळ्यात लाचखोर अलगद अडकले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सच्छिंद्र शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
नवीन वर्षातील पहिलीच कारवाई!
नवीन वर्षातील ही पहिलीच कारवाई आहे. गेल्या तीन वर्षांत (Akola Police) अकोला जिल्ह्यात लाचलुचपत प्रकरणांमध्ये सात पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई झाली आहे. २०२२ मध्ये तीन, २०२३ मध्ये एक, तर २०२४ मध्ये तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.