- अकोला जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस होईल जून,
- ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक
- जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Akola ) : २०२४ मध्ये राज्यात पावसाळा कसा राहील, कोणत्या महिन्यात खंड तर कोणत्या महिन्यात अधिक पाऊस राहील, याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ (Senior meteorologist) डॉ. रामचंद्र साबळे (Dr. Ramchandra Sable) यांनी भाकीत केले आहे. राज्यासह वर्तविलेल्या अंदाजामध्ये राज्यभरात सरासरीच्या ९९ तर अकोला जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस होईल. जून-जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता असून, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ( August-September ) पावसाचे प्रमाण अधिक राहील. तर कमी दिवसात अधिक पाऊस असेल, असे डॉ. साबळे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले. पश्चिम विदर्भातील ( West Vidarbha) अकोला जिल्ह्याची जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाची सरासरी ६८३ मिमी आहे. तथापि, यावर्षी ६७१ मिमी पाऊस होईल. मध्य विदर्भातील ( Central Vidarbha ) नागपूर जिल्ह्यात पावसाची सरासरी ९५८ मिमी इतकी असून, यावेळी ९३३ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील सिंदेवाही (चंद्रपूर) सरासरी ११९१ तर यावर्षी १२२६ मिमी पाऊस होईल. अर्थात येथे सरासरीच्या १०३ टक्के जिल्ह्यात सरासरीच्या ९७ टक्के, अधिक पाऊस पडेल. मराठवाड्यातील कोकण (Konkan in Marathwada ) विभागातील दापोली येथे परभणी सरासरीच्या १०६ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील निफाड जिल्हयात सरासरीच्या १०३ टक्के, धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के, जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयात सरासरीच्या ९५, कराड जिल्ह्यात ९७, पाडेगाव जिल्ह्यात ९५, सोलापूर जिल्ह्यात ९५, राहुरी जिल्ह्यात ९९, पुणे जिल्हयात १०० टक्के पाऊस होण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तविली आहे.
- गतवर्षी जून-जुलैमध्ये पावसात खंड
गतवर्षात अकोला जिल्ह्यात जून-जुलैमध्ये पावसात मोठा खंड पडला होता. जूनमध्ये तर पाऊसच नसल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यामुळे पेरण्यांना वेग आला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मोठा खंड पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर (farmers ) दुबार-तिबार पेरणीची वेळ आली होती. सप्टेंबरमध्येदेखील चांगला पाऊस न झाल्यामुळे खरिपातील उत्पादनात ( production in Kharip ) मोठी घट आली होती. यंदाही तीच परिस्थिती असल्याचे चित्र उभे होत आहे.
- कमी दिवसात अधिक पाऊस
महाराष्ट्रात ( Maharashtra ) सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होईल. हा अंदाज कमाल तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. वाऱ्याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून-जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, सिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील. – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे
–