■ बाळापूर तालुक्यात अनेक झाडे उन्मळून पडली
■ रात्रभर नागरिकांना राहावे लागले अंधारात वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस
अकोला (Akola) सोमवारी सायंकाळी बाळापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी हवेसह जोराचा पाऊस पडला असून वादळी हवेमुळे अनेक घरावरील टिनपत्रे (Tin letters house) उडून गेली तर अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने काही रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाळी प्रभावित झाली होती. विद्युत वितरण कंपनीचा (Electricity distribution company) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शेळद येथे विजेच्या तारावर झाड उन्मळून पडल्याने शहरातील विज पुरवठा खंडीत होती तर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना रात्र काळोखात काढावी लागली. सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान बाळापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी हवेसह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या वादळी हवेमुळे अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेले तर अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक सुध्दा काही वेळासाठी प्रभावित झाली होती. वादळी हवेमुळे शेळद येथील विद्युत तारांवर झाड उन्मळून पडल्यामुळे तारा तूटल्या तर सायंकाळी ६.३० वाजतापासून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत झाला. विजेअभावी लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच वृध्दांना मोठा त्रास सहन करावा लागला.
– ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत
सायंकाळी झालेल्या वादळी हवेमुळे बाळापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजिवन विस्कळीत झाले
तर विज वितरण कंपनीतील जबाबदार अधिकाऱ्याच्या (officer) बेपर्वा वृत्तीमुळे तालुकावासियांना रात्रभर अंधारात राहावे लागले. अनेक आजारी नागरिकांना विजे अभावी कुलर व पंखे बंद राहिल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला विज वितरण कंपनीमधील कुणीही जबाबदार अधिकारी फोल उचलायला तयार नसून बहूतांश सर्वच अधिकारी हे बाहेरगावी राहून काम पाहत असल्यामुळे शहरासहतालुक्यातील नागरिकांना नाहक च त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शेतकरी ग्राहक सरंक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश ठाकरे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी वागण्याच्या पध्दतीत बदल न केल्यास येत्या काही दिवसामध्ये नागरिकाच्या सहकार्याने विज वितरण कंपनीवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचा ईशाराही रमेश ठाकरे यांनी दिला आहे.