– काही दुकानदार शेतकऱ्यांना मूळ किमतीपेक्षा दुपटीने बियाणे विकत असल्याच्या आरोप होत आहे.
राहूल कुलट
अकोट (Akot) :- कपाशी बियाण्यांच्या विक्रीत काळाबाजार तसेच मूळ किमतीपेक्षा जादा भावाने शेतकऱ्यांच्या पसंतीची बियाणे विकल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत असतानाच आडसूळ येथे बुधवारी एका कृषी सेवा केंद्रावर (Krishi Seva Kendra ) झालेल्या कारवाईवरून यावर शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने आता महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला असून सर्वच कृषी सेवा केंद्रांची तपासणी तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या बियाण्यांमध्ये काळाबाजार होत असून काही दुकानदार शेतकऱ्यांना मूळ किमतीपेक्षा दुपटीने बियाणे विकत असल्याच्या आरोप होत आहे.कृषी विभागाच्या निदर्शनात सध्या बाजारपेठेत संबंधित बियाणे नसल्याचे सांगितल्या जात आहे. मात्र या दुकानदारांजवळ अधिकच्या भावाने बियाणे कसे उपलब्ध होते आणि हे कसे बियाणे विकतात या स्वरूपाच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी केल्यात. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागास सर्वच कृषी सेवाकेंद्रांची स्टॉक बुके व बिल बुक तपासणी करण्याचे आदेश दिले असून अकोट येथे तहसिलदार सुनील चव्हाण, मंडळ अधिकारी नीळकंठनेमाडे, कर्मचारी गौरव राजपूत आणि तलाठी अकोट दिनेश मोहोकार, शैलेश मेतकर या पथकाकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. शेतकऱ्यांजवळ क्षेत्रफळ जास्त असून दुकानांवर दोन पाकिटसाठी राहण्याऐवजी अधिकच्या भावाने कापूस बियाणे खरेदी करणे पसंत करत आहेत. त्यामुळे काही शेतकरी अधिकच्या भावाने कपाशी बियाणे खरेदी करतआहेत. यामुळेच काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांची नावे समोर येत नाहीत. कारण बाजारपेठेत बियाणे येत नाही आणि आलेच तर रांगांमध्ये दिवसभर उभे राहून दोनच पाकिटे मिळत आहेत. त्यामुळे काही शेतकरी कुठलाही त्रास न घेता अधिकच्या भावाने बियाणे खरेदी करत आहेत.
– भर उन्हातही प्रामाणिक सेवा परंपरा कायम !
अकोला: अकोल्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढताच आहे. घरबसल्या ऊन लागण्याचे प्रकार घडत आहेत. अशा परिस्थितीत अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले, अशा वातावरणात भारतीय डाक विभागाचे कर्मचारी पोस्टमन रखरखत्या उन्हात टपाल वितरण करताना दिसत आहेत. खासगी, शासकीय, निमशासकीय संस्थेची, वैयक्तीक आवश्यक सर्व कागदपत्रे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सल, साधी डाक, अन् रजिस्टर पार्सल या पद्धतीने भारतीय डाक विभागामार्फत पाठविले जातात. प्रामाणिक आणि चांगली सेवा या विभागामार्फत मिळते. त्यामुळे जनतेचा भारतीय डाक विभागावर विश्वास आहे. त्यामुळे टपालचे प्रमाणदेखील वाढले आहे.
- पसंतीचे कपाशी बियाणे आता मिळणार नाही !
अजूनही काही शेतकऱ्यांना पसंतीचे कपाशी बियाणे मिळाले नाही. तरीसुद्धा संबंधित कंपनीकडून अकोला मोहोन जिल्ह्यास संबंधित बियाण्यांचा पुरवठा होणार नसल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना आपल्या पसंतीचे बियाणे न मिळता बाजारात उपलब्ध असणाऱ्या बियाण्यांची खरेदी करावी लागणार आहे. त्यामध्ये सध्या कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना पसंतीची वेगवेगळ्या कंपनीची १०-१२ कपाशी बियाण्यांचा तुटवडा असल्याचे समजते.