– बाल शिवाजीची संस्कृती पाठक, भारत विद्यालयाचा अवधेश वानखडे
– होलीक्रॉसची शर्वरी, भारत विद्यालयाचा कुणाल ‘टॉपर्स’
होलीक्रॉसची शर्वरी खांडरे टॉपरमध्ये आल्याबद्दल देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी तिचे कौतुक केले.
यावेळी शर्वरीसोबत तिचे वडील मनोज खांडरेदेखील उपस्थित होते.
होलीक्रॉस कॉन्व्हेंटची ( Holy Cross Convent ) विद्यार्थीनी शर्वरी मनोज खांडरे हिला कला, क्रिडा, (Arts, sports ) सवलत गुण वगळता ९८.२० टक्के गुण मिळाले असून, भविष्यात तिला ‘आयआयटी’कडे जाऊन अभियंता व्हायचा मनोदय तिने व्यक्त केला आहे. दहावी परीक्षेसाठी तिने ‘टारगेट बेस’ अभ्यास केला असून, चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती; मात्र ‘टॉपर्स’ येणे हा सुखद धक्का असल्याचे तिने सांगितले. शर्वरीला क्रिकेटसह गायनाचा छंद आहे. शर्वरीचे वडील मनोज खांडरे महावितरणच्या मूर्तिजापूर उपविभागात उपकार्यकारी अभियंता तर आई रेणुका इलेक्ट्रीकल तपासणी विभागात शाखा अभियंता आहे
– जिल्ह्याचा १० वीचा निकाल ९६.४५ टक्के !
अकोला (Akola ) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( Maharashtra State Secondary ) शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा (10th Exam) निकाल सोमवारी ऑनलाइन जाहीर झाला. या ऑनलाइन निकालानुसार, क्रीडा, कला सवलत गुण वगळता निखळ गुणांच्या आधारे यंदाच्या निकालात ‘टॉपर्स मध्ये होलीक्रॉस ( Holy Cross Convent ) कॉन्व्हेंटची शर्वरी मनोज खांडरे हिने ९८. २० टक्के गुण मिळविले असून भारत विद्यालयाचा कुणाल चव्हाण यानेही सवलत गुण वगळता ९८. २० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या संस्कृती विनायक पाठक हिला ९८ टक्के तर भारत विद्यालयाच्या अवधेश वानखडे यालाही ९८ टक्के गुण मिळाले असून सवलतीच्या गुणांव्यतिरिक्त सदर विद्यार्थ्यांनी टॉपर्समध्ये स्थान मिळविले आहे. दरम्यान, यंदाच्या दहावीच्या निकालात क्रीडा आणि कला सवलतीसह १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच या सवलतीच्या गुणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ९९ टक्क्यांपर्यंत गुण असल्याचे ऑनलाइन निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदाच्या निकालाची टक्केवारी ९६.४५ असून
सवलतीच्या गुणांनी मात्र विद्यार्थ्यांनी १०० टक्क्यांपर्यंत मजल मारल्याचे स्पष्ट होत आहे.