१२ दुचाकी केल्या जप्त
बार्शिटाकळी(Akola) :- बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी (Complaints) येत होत्या. याचा छडा लावत बार्शिटाकळी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्यात यश मिळविले आहे.
तालुक्यातील अनेक दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या होत्या. या संदर्भात बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) भांदवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर बार्शिटाकळी शहरातील प्रदीप गौतम निखाडे व सय्यद मोहसिन सय्यद कुदुस रा. दिग्रस जि. यवतमाळ (Yavatmal) यांना अटक केल्यानंतर दुचाक्या जप्त करून एक दुचाकी सुपूर्द नाम्यावर संबंधितांना दिली.
आरोपींनी यावेळी १२ गुन्ह्याची कबुली दिली असून, उर्वरित दुचाकी जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे, एएसआय शेख फरान, पोकॉ पंकज पवार, नागसेन वानखडे, पोकॉ ईश्वर पातोंड व मनीष घुगे यांनी केली आहे.