– केवळ १४.५० दलघमी पाणी शिल्लक
– तीन मध्यम प्रकल्पांनीही गाठलंय तळ
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Akola) : गतवर्षी मान्सून सत्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मोठे आणि लहान पाणीपुरवठा सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा राहिला आहे. अकोला शहराला ( Akola city )पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात (Dam)केवळ १४.५० दलघमी पाणी शिल्लक राहिला आहे. काटेपूर्णा अर्थात महानसारख्या मोठ्या प्रकल्पाची ही अवस्था असताना अकोला जिल्ह्यात लघु व मध्यम जलप्रकल्पाने तळ गाठले असून यंदा पाऊस लांबल्यास अकोला शहरासह जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अकोला जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी अनेक भागात भटकंती सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पांनी तळ गाठले आहे. अकोल्याच्या विक्रमी तापमानात कुलरचा वापर वाढला असून वाढत्या तापमानामुळे दुसरीकडे पाण्याची मागणीही वाढत आहे. पाटबंधारे विभागाने (Irrigation Department ) आतापासूनच पाण्याच्या काटकसरीने वाटपाचे धोरण अवलंबले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सोमवार, २७ मे पासून अकोला शहराला होणारा पाणीपुरवठा आता ४ ऐवजी आता ५ व्या दिवशी करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाच्या पाणी योजनांवरून इतर गावांना होणारा ग्रामीण पाणीपुरवठाही कमी दाबाने व नेहमीच्या तुलनेत कमी वेळ होत आहे. अकोला जिल्ह्यात पारा चढताच असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील बहुतेक जल प्रकल्पांची पाणी पातळी खालावली आहे. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम तर ३२ लघु प्रकल्पात पाण्याची साठवण केली जाते. सदर प्रकल्प मिळून ३२९.२२ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता झाली आहे,
– मोठ्या, मध्यम प्रकल्पातील जलसाठा
काटेपूर्णा प्रकल्प १४.५०
दलघमी वान प्रकल्प २६.४०
मोर्णा प्रकल्प १०.२६
निर्गुणा प्रकल्प ०२.९८
उमा प्रकल्प ०१.१०
या प्रकल्पातून पिण्यासाठी, सिंचनासाठी तसेच औद्योगिक वसाहतीसाठी पाणी दिले जाते. जिल्ह्यात पातूर तालुक्यात मोर्णा नदीवर मोर्णा प्रकल्पाची ४९.४६ दलथमी साठवण क्षमता, निर्गुणा दलघमीनदीवर निर्गुणाप्रकल्प २८.८५ साठवण क्षमता, मूर्तिजापूर तालुक्यात ( Murtijapur Taluka) उ उमा नदीवर उमा प्रकल्पाची १९६८ दलघमी साठवण क्षमता असलेले असेतीन मध्यम प्रकल्प आहेत. अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या तीन मध्यम प्रकल्पात साठवण क्षमतेच्या केवळ १४.३४ दशलक्ष घनमीटर जलसाठा राहिला आहे. तर जिल्ह्यातील मोठ्या आणि अकोला महानगराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातही केवळ १४.५० दशलक्ष घनमीटर अर्थात जवळपास १६ टक्के साठा आजच्या स्थितीत शिल्लक आहे. यंदा पावसाने क्लिंब केल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत गेल्या आठवड्यापासून सूर्य आग ओकत आहे