अकोला (Akola Women Hospital) : शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरक्षेचा कंत्राट मॅस्को कंपनीला देण्यात आला असून, या कंपनीच्या सुपरवायजरसह तिघांनी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला प्रचंड त्रास देउन शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार महिलेने रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दिली. या (Akola Women Hospital) प्रकरणात महिलेने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Akola Women Hospital) गेल्या काही दिवसांपासून गैरप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, यावर प्रशासनाने काहीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला याच ठिकाणी मॅस्को कंपनीत कार्यरत असलेले गायकवाड सुरक्षा रक्षक, ब्रम्हदेव सुपरवायजर, काठोडे हे तिघे विविध कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या तिघांच्या शारीरिक छळाला कंटाळून महिलेने रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.