■ मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
■ संमेलनाध्यक्ष प्रा. दीपाली सोसे यांचे मत
अकोला (Akola): आपण सर्व मराठी भाषिक (Marathi speaking) लोक आहोत, मराठी ही आपली मातृभाषा तर आहेच, ण मराठी भाषा ही प्रत्येकाचा श्वास असली, तरच येणाऱ्या काळात जागतिक मराठी दिन (World Marathi Day) सणांसारखा, उत्सवासारखा साजरा करण्याचे सुरेख निमित्त साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्हायला हवे; तसेच मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळायलाच पाहिजे, त्याकरिता फक्त उपलब्ध परिपूर्ण माहिती केंद्र सरकार ( Central Govt ) पर्यंत पोहोचवून मराठी भाषा ही अभिजातच असल्याचे दाखवून भारतातील सातवी अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेचा गौरव व्हायलाच हवा, असे मत सहाव्या मराठी जिल्हा साहित्य संमेलनाच्या (District Literary Conference ) अध्यक्ष ख्यातनाम लेखिका प्रा. दीपाली आतिश सोसे यांनी अध्यक्षीय भाषणाच्या वेळी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदन हॉलमध्ये रविवारी आयोजित सहाव्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या संमेलनाध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. मराठी भाषा ही आपली जननी असून या भाषेसाठी गांभीर्याने लेखन व कार्य करण्याची नितांत गरज असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त तरुणाई फाउंडेशन, कुटासातर्फे ज्येष्ठ कवी स्व. अरविंद भोंडे साहित्य नगरीत आयोजित या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. दीपाली सोसे, उदघाटक प्रसिध्द अभिनेत्री रसिका धामणकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सतीश तराळ, हास्य जत्रा फेम कुणाल मेश्राम, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. किरण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक संदीप देशमूख, संचालन राहुल भगत यांनी तर आभार प्रा. गणेश मेनकार यांनी मानले.
मराठी साहित्यात भावभावनांचे प्रतिबिंब, अभिनेत्री रसिका धामणकर यांचे प्रतिपादन
मराठी साहित्य निर्मितीमध्ये भावभावनांचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. लेखक, कवी बांधीलकी जपून ज्याप्रमाणे लिखाण करतात, त्याचप्रमाणे कलावंतही मनोरंजनातून समाज प्रबोधनाचा वसा चालवितात. जो सर्वांची मनोभुमिका जपतो, रसिकांचे मनोरंजन करतो तोच खरा कलावंत आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री रसिका धामणकर (Actress Rasika Dhamankar) यांनी केले.