अकोला (Akola):- अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील भीमाशंकर म्हणून प्रसिद्ध असलेले गुप्तेश्वर शिवलिंग पूर्णा नदीच्या तीरावर पानेट या गावात महाशिवरात्रीला (Mahashivratri) व श्रावण महिन्यामध्ये पाच जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janta Patry)प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्वचे सक्रिय आमदार रणधीर सावरकर यांनी पानेट तीर्थस्थळ म्हणून मान्यता प्राप्त करून त्यासाठी तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.
३ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी तरतूद
त्या परिसरात सभागृह तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तसेच अकोट आणि अकोला या भागातून येणाऱ्या भाविक भक्तांना रस्ता व्हावा यासाठी दोन कोटी रुपयांचा विशेष निधी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत मंजूर केला. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच येणाऱ्या शिवरात्रीला भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
अकोला पूर्वमधील पानेट प्रतिभीमाशंकर म्हणून प्रसिद्ध
२६ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे मोठ्या संख्येने कुंभमेळ्यासाठी भाविक भक्त स्नानासाठी येणार आहे. त्याच धर्तीवर पूर्णा नदीतीरावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी, दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी कामाला गती देण्यात यावी अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी देऊन वेगवेगळ्या सामाजिक संस्थेने या तीर्थस्थळावर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. वेगवेगळ्या धार्मिक, सामाजिक संस्था आपल्या सेवा या भागात देणार असून, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी याभागाची पाहणी करून गुप्तेश्वर भीमाशंकर महादेव मंदिराला व ब्रह्मचारी देवस्थान मंदिराला भेटी देऊन विकासकामाचा आढावा घेतला.
तातडीने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना !
पानेट संस्थान येथील विविध विकासकामांची पाहणी करताना लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याकरिता अधिकारी वर्गांसोबत पाहणी करताना आमदार रणधीर सावरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजीव सुलताने, शुभम म्हैसने, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे आपोतीकर, विजय अग्रवाल, जयंतराव मसने, गिरीश जोशी, शंकरराव वाकोडे, राजेश नागमते, मनीष मोडक, विवेक भरणे, मधुकर पाटकर, दत्तू पाटील गावंडे, ज्ञानेश्वर मोडक, पवन वर्मा, सरपंच वाघमारे, बंडू मुकुंदे, किशोर बुले, नारायण साबळे, दिलीप सुलताने, राजू खंडारे, पूर्णाजी खोडके, अनिलइंगळे, यादव, माधवबकाल, गजानननळे, बोचे, अनिल इंगळे, सुभाष मुकुंद, नारायण साबळे सोबत होते.
आमदार सावरकरांची भाविकांशी चर्चा !
त्या तीरापर्यंत भुयारातून जाण्याचा मार्ग असून, या जागृत देवस्थानला मानणाऱ्यांची संख्या पाच जिल्ह्यात मोठ्या संख्येत असून, त्यांच्या सुविधेसाठी मोठे सभागृह, सुविधायुक्त इमारती, वेगवेगळे हॉल बांधण्यात आले आहे. त्याचा आढावा व १ कोटी १७ लाख रुपयांच्या करोडी फाटा ते पानेट या रस्त्याची पाहणी करून या दोन ठिकाणी पूल निर्माणाचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून आमदार सावरकर यांनी भाविक भक्तांच्या भावना समजून घेतल्या.