अकोला (Prakash Pohare) : समाजाच्या विविध क्षेत्रांत जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना सर्वांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे त्याला जनसेवेसाठी (Public Service) अधिक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन शेतकरी नेते, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते रहेमान बाबू यांनी फातेमा फाउंडेशनतर्फे फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. माजी राज्यमंत्री (Former Minister of State) अझहर हुसेन (Azhar Hussain) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, समाजसेवक जावेद जकारिया, डॉ. दीपक केळकर अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
डॉ. झिशान हुसेन यांचा सत्कार!
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य सेवेत (Health Care) हिरिरीने काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉ. झिशान हुसेन यांचा प्रकाश पोहरे (Prakash Pohre) यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते अझहर हुसेन यांनी यावेळी बोलताना अभ्यासू आणि संघर्षशील नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांच्या कार्याची प्रशंसा केली. लक्ष्मणरावतायडे, गुलाबराव गावंडे, ज्येष्ठ पत्रकार मिरसाहेब, डॉ. केळकर यांनी यावेळी विचार प्रकट केले.
कार्यक्रमात आयोजक रहेमान बाबू, मिल्लत शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. सरफराज खान, ऍड. रबी अहेमद खान, समाजसेवक जावेद जकारिया, इब्राहीम खान, माजी नगरसेवक शे. इब्राहीम, डॉ. अवेस, अयाज खान, सै. यासिन, शे. अहेमद, शेख करीम, सलीमभाई, ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ला, मनीष मिश्रा, अशपाकभाई, हॉटेल देहली दरबारचे संचालक तारीकखान, शाहीद इकबाल, सरदार खान, इमरान खान, संतोष गबई आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा यांनी केले तर आभार खान सरदार खान यांनी मानले.
सत्ताधारी जनतेची दिशाभूल करीत आहे…
आज चोहीकडे अस्वस्थता पसरलेली आहे. शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीयांसह समाजाचे विविध घटक सरकारच्या (Government) चुकीच्या धोरणामुळे संकटात आहेत. भ्रष्टाचार, महागाई अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाय करण्यापेक्षा सत्ताधारी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून दिशाभूल करीत आहेत. जाती, धर्माचे मुद्दे उकरून काढले जात आहेत. धनवान लॉबीसाठी आरोग्याच्या विविध समस्या निर्माण केल्या जात आहेत, असे आरोपही पोहरे (Prakash Pohare) यांनी यावेळी केले.