अकोट (Akot Crime) : मतिमंद व दिव्यांग असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने ढोमणपुरा सोमवारवेस येथील आरोपी राजेश मनोहर पा’क याला अकोट येथील (Akot court) जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी दुहेरी जन्मथेपेच्या कारावासाची शिक्षा व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी सहा वर्षांचा कारावास आरोपीस भोगावा लागणार आहे.
पीडिता मुलगी ही गर्भवती असल्याचे निष्पन्न
नमूद प्रकरणात पीडितेची आई फिर्यादी आहे. पीडिता मुलगी जन्मत:च मतिमंद व दिव्यांग आहे. सन २०२० मध्ये पीडिता मुलगी ही गर्भवती असल्याचे (Akot Crime) निष्पन्न झाले. तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने फिर्यादी व नातेवाईक घरी नसताना राजेश मनोहर पा’क याने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली, अशी फिर्याद पीडितेच्या आईने (Akot police) अकोट शहर पोलिस स्टेशनला दिली होती.
एकूण २२ साक्षीदारांच्या साक्ष
या (Akot Crime) प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पी.बी. सहारे यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता एकूण २२ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. सदर प्रकरणात आरोपीविरूद्ध कलम ३७६ (२) (एएल), ३७६ (२) (एएन), ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा सिद्ध झाला. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस दुहेरी जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली. (Akot polic) अंमलदार एपीआय धीरज चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून हेकाँ प्रकाश जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले.