मानोरा(Washim):- विधानसभा निवडणुकासाठी अकोटच्या जागेवर नजर लावून बसलेले माजी पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांचा अकोटचा टॉक टाईम पक्षाने संपुष्टात आणला असुन त्यांना अकोटला लुडबुड नको असा थेट आदेशच भाजपाने(BJP) दिल्यामुळे त्यांचे गटांगळ्या खाणारे जहाज आता वाशीम जिल्हयातील कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाकडे वळले आहे.
डॉ. रणजित पाटलांचे जहाज कारंजाकडे वळला
डॉ. पाटील काहीही संबंध नसताना अचानक आता निवडणुकीच्या तोंडावर सक्रीय झाल्यामुळे स्थानिक इच्छुकांचे कान टवकारले आहेत . अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून नवख्या उमेदवाराकडून सपाटून पराभव झाल्यावर डॉ. रणजित पाटील यांनी काही काळ वैद्यकीय व्यवसाय सांभाळण्याचा आभास निर्माण करून काही अपूर्ण बांधकामे पूर्णत्वास नेल्यावर पुन्हा स्वतःसाठी जिल्हयात मतदार संघ शोधण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी अकोट मतदार संघात निवडक फ्लॉप(Flop) कार्यक्रम घेऊन हवा तयार करण्याचा प्रयत्न करून बघितला. मात्र अकोट मतदार संघात खुद्द भाजप मधूनच त्यांना विरोध होवून अनेकांनी परत जाण्याच्या सुचना केल्यामुळे बावचळलेले डॉ. पाटील गेल्या आठवड्यात देवा भाऊच्या कानाशी लागले तेंव्हा त्यांना थेट अकोट मध्ये जादूचे प्रयोग थांबवा, कारंजा मतदार संघात थोपटून बघा, जमीन हाताशी लागत असेल तर बघू असे आदेश झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.