मुंबई (Akshay Kumar) : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सेटवर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, ‘हाऊसफुल 5’ च्या सेटवर अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंगही थांबवावे लागले. मात्र, अद्याप ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) टीमकडून याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. स्टंट करत असताना अक्षय कुमारच्या डोळ्यात एक वस्तू गेली. त्यानंतर लगेचच सेटवर नेत्ररोग तज्ज्ञ (eye doctor) बोलावण्यात आले. त्यांनी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि अभिनेत्याला काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले. इतर कलाकारांनी चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.
अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत झाली आहे
अक्षय कुमारला (Akshay Kumar) पुन्हा शूटिंग सुरू करायचे आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्यामुळे चित्रपटाचे शूटिंग रखडावे, असे त्याला वाटत नाही. सध्या हाऊसफुल 5 चे (Housefull 5) शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. लवकरच संपूर्ण टीम ते पूर्ण करेल आणि त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू होईल.
हाउसफुल 5 कलाकार
तरुण मनसुखियाच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘हाऊसफुल 5’ जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या (Housefull 5) चित्रपटात रितेश देशमुख, अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे आणि नर्गिस फाखरी यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. इतकेच नाही तर नाना पाटेकर, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग आणि जॅकी श्रॉफही आहेत.