हिंगोली(hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील आरोग्य उपकेंद्रात रोज रात्री मद्यपींची मैफल जमत असून रोज सकाळी दारूच्या(alcohol) बाटल्यांचा खच तिथे पडलेला आढळतो.
आरोग्य मंदिर की दारूचा अड्डा
तपोवन येथील आरोग्य उपकेंद्र जवळा बाजार येथील आरोग्य केंद्राच्या(Health Centers) अंतर्गत येत असून आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी मुक्कामी राहत नसल्यामुळे रोज रात्री मद्यपी (alcoholic) या आरोग्य मंदिराचा दारूची घुटी(डोस) घेण्यासाठी सहारा घेत असल्याचे चित्र मागील अनेक महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. सर्व प्रकारच्या देशी व विदेशी दारू (foreign liquor) आता सर्वच गावांमध्ये कोणी ना कोणी छुप्या पद्धतीने विकतच असतात. मद्यपींना माहीत असणारे हे अड्डे नेमके पोलिसांनाच माहीत नसतात. मद्यपींच्या या अड्ड्याला सर्वसामान्य नागरिक व महिला वर्ग त्रस्त(Women suffer) असला तरी कार्यवाही कधीच होताना दिसत नसल्यामुळे मूग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.