मुंबई (Alka Yagnik) : प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अलका याग्निक यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांची (Alka Yagnik) गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करतात. गायकाच्या सुरेल आवाजाने जगाला वेडं लावलं. त्यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची बातमी ऐकताच चाहते चिंतित झाले आहेत.
गायिका अलका याज्ञिक यांना दोन्ही कानांनी ऐकू न येणे झाले बंद
अलका याग्निक (Alka Yagnik) या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. यासोबतच अलका याग्निक यांनी आजारपणाची व्यथाही पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अलका याग्निक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने सांगितले की, तिला दुर्मिळ शारीरिक समस्या आहे, ज्यामुळे तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिला व्हायरल अटॅकमुळे हा त्रास झाला आहे. अलका याग्निकने त्यांच्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. गायिका अलका याग्निक यांना रेअर सेंसरिन्यूट्रल नर्व्ह हिअरिंग लॉस हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामध्ये कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस डॅमेज होते.
अचानक ऐकू येणं बंद होण्यामागची कारणे काय?
हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयोमानानुसार नस डॅमेज होतात. काही वेळेस व्हायरल इंन्फेक्शनमुळे मेनिन्जायटिस, गोवर आणि मेनिएर रोग यांसारख्या रोगांनंतर नसांचे नुकसान होते. डोक्याला किंवा कानाला दुखापत झाल्यामुळेही नसांचे नुकसान होते. कानाच्या आतील पेशींना इजा पोहोचवणाऱ्या काही औषधांमुळे नसा डॅमेज होऊन बहिरेपणा येतो. बराच वेळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने बहिरेपणा येऊ शकतो.
या आजारावर उपाय काय?
असा प्रश्न आपल्याला पडला असेल, दरम्यान, ह्यावर इंन्फेक्शनमुळे बहिरेपणा आला असेल तर, हळूहळू रुग्ण बरा होतो आणि त्याला ऐकू येऊ लागते. पण, हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. मात्र, उपचारांमुळे काही प्रमाणात ऐकण्याची क्षमता परत आणता येऊ शकते. यामध्ये, औषधे, कॉक्लियर इम्प्लांट आणि श्रवणयंत्र यांचा समावेश आहे.