Housefull 5:- हाऊसफुल 5 ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे. साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) निर्मित या चित्रपटाच्या पाचव्या भागाची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली होती. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)यांच्याशिवाय या चित्रपटाचे मुख्य कलाकार आधीच फायनल झाले होते.
निर्मात्यांनी हाऊसफुल 5 साठी हिरोइन्सची नावे देखील लॉक केली
आता निर्मात्यांनी हाऊसफुल 5 साठी हिरोइन्सची नावे देखील लॉक केली आहेत. अक्षय कुमारच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘हाऊसफुल’च्या पाचव्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मनोरंजनाचा पुरेपूर डोस देणाऱ्या या चित्रपटाबाबत दररोज काही ना काही अपडेट समोर येतात. अक्षय कुमार-रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्याशिवाय संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि डिनो मोरिया हे देखील चित्रपटात नायक म्हणून महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.