मुंबई (BMW Car) : बीएमडब्ल्यू इंडियाने देशामध्ये ऑल-न्यू बीएमडब्ल्यू 5 सिरीज लाँग व्हीलबेस लाँच केली आहे. ही कार भारतभरातील (BMW Car) बीएमडब्ल्यू डिलरशिप्समध्ये, तसेच डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. बीएमडब्ल्यू .इन वर बुक करता येऊ शकते. डिलिव्हरीजना सप्टेंबर 2024 पासून सुरूवात होईल. बीएमडब्ल्यू 5 सिरीज बीएमडब्ल्यू ब्रँडचा आधारस्तंभ आहे; जागतिक स्तरावर, ही सिरीज अनेक वर्षांपासून प्रतिष्ठित एक्झिक्युटिव्ह सेदान सेगमेंटमध्ये बाजारपेठ अग्रणी राहिली आहे. 1972 मध्ये पहिली जनरेशन लाँच झाल्यापासून 5 सिरीजच्या जवळपास 10 मिलियन युनिट्सची विक्री झाली आहे.
जगातील सर्वात यशस्वी बिझनेस सेदानची आठवी जनरेशन आतापर्यंतची सर्वात डायनॅमिक आहे. जिच्यामध्ये अनेक डिजिटल इनोव्हेशन्स आहेत. श्री. विक्रम पावाह, प्रेसिडण्ट, ॲण्ड सीईओ (BMW Car) बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्हणाले, “अधिक आरामदायी, अधिक डिजिटल आणि अधिक डायनॅमिक असलेली ऑल-न्यू बीएमडब्ल्यू 5 सिरीज लाँग व्हीलबेस आधुनिकता, उपस्थिती व सुस्पष्टतेची पूर्णतः नवीन अभिव्यक्ती सादर करते. या वेईकलमध्ये अद्वितीय ऐसपैस जागा आणि लक्झरीअस आरामदायीपणा आहे. ही वेईकल उल्लेखनीय टेक्नॉलॉजिकल कौशल्य आणि प्रगतीशील वृत्तीसह स्पोर्टी, आकर्षक डिझाइन व हॉलमार्क ड्रायव्हिंग प्लेजरसाठी ओळखली जाते. भारत ऑल-न्यू 5 ला लाँच व्हीलबेस अवतारामध्ये सादर करणारी जगातील पहिली राइट-हँड ड्राइव्ह बाजारपेठ आहे.
ही वेईकल भारतातील आमच्या प्रीमियम क्लायण्टेलच्या गरजांना अनुसुरून डिझाइन करण्यात आली आहे आणि कोणत्याही प्रसंगासाठी, व्यावसायिक किंवा वैयक्तिक, शहरी किंवा लांब अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी अपवादात्मक आरामदायीपणा व वैविध्यता देते. (BMW Car) बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांट, चेन्नई येथे स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेली ऑल-न्यू बीएमडब्ल्यू 5 सिरीज लाँग व्हीलबेस फक्त पेट्रोल व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध आहे. सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत आहे . बीएमडब्ल्यू 530 एलआय एम स्पोर्ट : आयएनआर 72,90,000 इन्वॉइसिंगच्या वेळी अस्तित्त्वात असलेली किंमत लागू होईल. जीएसटी सह एक्स-शोरूम किंमती (कम्पेन्सेशन सेससह) लागू होतील परंतु रोड टॅक्स, टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (टीसीएस), आरटीओ स्टॅट्युअरी टॅक्सेस/फीज, इतर लोकल टॅक्स/सेस लेव्हीज आणि इन्शुरन्स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. किंमत पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कृपया ऑथोराइज्ड बीएमडब्ल्यू डिलरशी संपर्क साधावा.
ऑल-न्यू बीएमडब्ल्यू 5 सिरीज लाँग व्हीलबेस चार आकर्षक मेटलिक पेंटवर्क्समध्ये उपलब्ध आहे मिनरल व्हाइट, फायटोनिक ब्ल्यू, एम कार्बन ब्लॅक आणि स्पार्कलिंग कॉपर ग्रे. पहिल्यांदाच, बीएमडब्ल्यू 5 सिरीजमध्ये पूर्णतः वेगन इंटीरिअर अपहोल्स्टरी आहे. ड्युअल-टोन अपहोल्स्टरी संयोजनांच्या निवडीमध्ये वेगान्झा। कॉपर ब्राऊन / अॅटलास ग्रे व मेरिटाइम / ब्लॅक ऑप्शन्स.
सर्विस इनक्लुसिव्ह आणि सर्विस इनक्लुसिव्ह प्लस मालकीहक्काचा खर्च अधिक कमी करतात. ग्राहक कालावधी व मायलेजनुसार विविध सर्विस प्लान्समधून निवड करू शकतात. पॅकेजेसमध्ये कंडिशन बेस्डसर्विस (सीबीएस) आणि मेन्टेनन्स कामासह 3 वर्ष / 40,000 किलोमीटरस पासून सुरू होणाऱ्या योजनांचा समावेश आहे. हे पॅकेज जवळपास 10 वर्ष/ 2,00,000 किलोमीटरस पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच जवळपास 10 वर्षा पर्यंतवॉरंटी प्रोग्राम विस्तारित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
बीएमडब्ल्यू इंडिया फायनान्शियल सर्विसेस व्यक्तींना त्यांच्या गरजांनुसार सानुकूल व स्थिर फायनान्शियल सोल्यूशन्स देतात. (BMW Car) ग्राहक बीएमडब्ल्यू 360° इंटीग्रेटेड ऑफरसह अद्वितीय सोयीसुविधा आणि बचतींचा आनंद घेऊ शकतात. ऑल-न्यू बीएमडब्ल्यू 5 सिरीजची खरेदी एक्स्टेण्डेड वॉरंटी, बीएमडब्ल्यू सर्विस इन्क्लुसिव्ह पॅकेज, बीएमडब्ल्यू सेक्युअर पॅकेज (संपूर्ण कर्ज मुदतीचा समावेश) आणि प्रतिमहिना फक्त आयएनआर 77,000 पासून सुरू होणाऱ्या मासिक हप्त्यामध्ये एक वर्षाच्या वेईकल इन्शुरन्ससह अधिक उत्साहित करता येऊ शकते. तसेच, ग्राहक कमी व्याजदरामधून फायदा घेऊ शकतात आणि 3 वर्षा नंतर 72% दर्जात्मक बायबॅक अशुअरन्सचा आनंद घेऊ शकतात.