हिंगोली(Hingoli):- जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २८ ऑक्टोंबरला अनेक ठिकाणी छापे मारून ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा(alcohol) व २४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले.
२४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला व गुटखा जप्त
सण व उत्सव निमित्ताने तसेच विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर अवैध दारू(Illegal liquor) व गुटखा विक्रीवर छापे मारण्याच्या सूचना नांदेड परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑक्टोंबरला जिल्हाभरात विविध ठिकाणी देशी-विदेशी दारू व सुंगधीत पानमसाला गुटख्यावर छापे मारले. या निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, सुरेश दळवे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी हिंगोली जिल्ह्यात ९९ ठिकाणी हॉटेल व ढाब्याची तपासणी(Inspection) करून ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा व २४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी अचानक ऑल आऊट ऑपरेशन राबवून जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे तसेच पानटपर्या, किराणा दुकानावर छापे मारून अवैध दारूसाठा व गुटखा जप्त केल्याने व्यावसायिकात एकच खळबळ उडाली आहे.
अधुनमधून राबविले ऑलआऊट ऑपरेशन
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात अधुनमधून ऑल आऊट ऑपरेशन राबविले जात आहे. त्या निमित्ताने विविध ठिकाणी हॉटेल, ढाब्यावरील अवैध देशी-विदेशी दारू तसेच पानटपर्यामधील आणि किराणा दुकानातील अवैध गुटख्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.