4 जानेवारी रोजी निघणार शांती मोर्चा
सर्वांना मोर्चात सहभागी होण्याची आवाहन
परभणी (Santosh Deshmukh murder case) : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप पर्यंत मुख्य आरोपीस अटक नाही. देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय, सामाजिक संघटना व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत 4 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नूतन विद्यामंदिर जिंतूर रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh) परभणीत मोर्चा काढण्यासंदर्भात सर्वपक्षीय, सामाजिक संघटना व जाती-धर्माची एक बैठक रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी अतिथी हॉटेल येथे पार पडली. या बैठकीला मोठ्या प्रमाणावर विविध समाजाचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप पर्यंत मुख्य आरोपी यास अटक न केल्याच्या निषेधार्थ सामाजिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
खुणा मागचा मास्टरमाइंड हा वाल्मीक कराड असून त्यास वाचवणारा मंत्री धनंजय मुंडे हा आहे. त्यामुळे शासनाकडून अद्याप पर्यंत मुख्य आरोपीस अटक केलेली नाही सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट आल्याने त्यांना न्याय देण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय शांती मोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरले आहे. या शांती मोर्चाला परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून नागरिक उपस्थित राहणार आहेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्रमुख मागण्यांचे एक निवेदन तयार करून प्रशासनाला देण्यात येणार आहे. नूतन विद्यालय मैदान जिंतूर रोड येथून मोर्चा निघणार असून शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्याचे ठरले आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
1 जानेवारीला परभणी शहरात नियोजन बैठक
शांती मोर्चा काढण्याच्या संदर्भात एक जानेवारीला सकाळी 11 वाजता अतिथी हॉटेल येते एक संयुक्त सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. (Santosh Deshmukh) जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सरपंच या बैठकीला हजर राहणार आहेत. तसेच डॉक्टर, वकील, व्यापारी, सामाजिक संघटना यांना बोलवण्यात येणार आहे. शांती मोर्चा ची पुढील दिशा या बैठकीमध्ये ठरणार आहे.