* २८ आक्टोंबरला सगळेच इच्छुक भरतील उमेदवारी अर्ज
हिंगोली (Manoj Jarange Patil ) : संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडेच सध्या उमेदवारांची सगळ्यात मोठी यादी आहे. सर्व इच्छुकांमधून सामोपचाराने एक नाव निश्चित करण्याची सूचना (Manoj Jarange Patil ) जरांगे पाटलांनी दिली होती. हिंगोलीत याकरीता शनिवारी झालेल्या बैठकीत एका उमेदवारी मात्र एकमत होऊ शकले नाही.
जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून उमेदवारी मिळविण्यासाठी हिंगोली विधानसभा मतदार संघातून १९ जणांनी अर्ज सादर केला होता. त्यापैकी दोन नावे कमी झाली असून सर्व १७ उमेदवारांची एक बैठक शनिवारी हिंगोलीत घेण्यात आली. या बैठकीत स्वत: माघार घेऊन एखाद्याचे नाव निश्चित करण्याची तयारी कोणीही दर्शविली नाही. यामुळे सामोपचाराचा पहिला प्रयोग अयशस्वी झाला आहे.
याबाबत सर्व उमेदवारांना सूचना करण्यात आली होती की, एका उमेदवाराच्या नावावर सर्व इच्छुकांचे एकमत होत नसेल तर २८ ऑक्टोंबर रोजी सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणीही शक्तीप्रदर्शन करू नये व सर्व इच्छुकांनी सोबत जाऊन एकाच वेळी आपले अर्ज दाखल करावे, अशीही सूचना करण्यात आली होती. यानुसार २८ तारखेला सर्व १७ इच्छुक उमेदवारी दाखल करतील अशी माहिती बैठकीच्या संयोजकांनी दिली आहे. उमेदवारी दाखल करणार्या इच्छुकांची यादी ३ तारखेपूर्वी जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ते स्वत: सर्व इच्छुकांपैकी एक नाव निश्चित करतील व इतर सर्व इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. उमेदवारी मागे घेणार्या सर्व इच्छुकांनी जरांगे पाटलांनी ठरविलेल्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.