गोरगरीब, सामान्याच्या लेकरांना शिकू द्या,आम्हाला शिकवू द्या; शिक्षक संघटनेची आर्त हाक
अर्जुनी मोर (Zilla Parishad school) : शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा शासन निर्णय खेड्यापाड्यातील वस्तीवरील आणि विद्यार्थ्यावर अन्यायकार करणारा आहे, परिणामी दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत. या मागणीसाठी राज्यातील सर्व (Zilla Parishad school) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा उद्या 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. परिणामी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 130 शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय तालुका समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आला आहे तसे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
यात 25 सप्टेंबरला तालुक्यातील सर्व शिक्षकांनी किरकोळ रजा टाकून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे, हा मोर्चा नवीन प्रशासकीय इमारत ते (Zilla Parishad school) जिल्हा परिषद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय समितीचे सुरेंद्र भैसारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष कैलास हांडगे, संघटनेचे सचिव लाखेश्वर लंजे, सहकार संघटनेचे तालुका अध्यक्ष नरेश लंजे, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष आशिष कापगते, कास्ट्राईब संघटनेचे तालुका सचिव पी एन जगझापे, पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष संचित वाळवे, विनोद बडोले, अरविंद नाकाडे, रमेश संग्रामे, कीर्तीवर्धन मेश्राम, दिलीप लोधी, किशोर लंजे, जगदीश मेश्राम, गजानन रामटेके, प्रशांत चव्हाण नागेंद्र खोब्रागडे व इतरही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे.
असे आहेत मुख्य मागण्या
शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने वास्तव अडचणी लक्षात घेता आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, (Zilla Parishad school) शैक्षणिक कामाच्या निर्णयात शिक्षक संघटनासह चर्चा करून दुरुस्ती करावी, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब देण्यासाठी राबवलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी, ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत तिथे स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करावी, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सर्व पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, जुन्या पेन्शनचे आदेश निर्गमित करावेत आधी मागण्यांचा समावेश आहे