शिवाजी शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
लाखो रुपये घेऊन कार्यकारी मंडळाने केली बेकायदेशीर पद भरती
निलंगा (Radhika Sriram Solunke) : कार्यकारी मंडळातील उपाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापिकेच्या संगनमताने शिवाजी शिक्षण संस्थेत बेकायदेशीर पदभरती होत असून माझी या संस्थेत 2017 या वर्षी लिपिक पदावर नियुक्ती झाली असताना विद्यमान मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी शासनाकडे माझा प्रस्ताव न पाठवता दुसऱ्याचा प्रस्ताव पाठवून मान्यता घेतली आहे. याबाबत विचारणा केली असता मलाच धक्काबुक्की करून शिवव्याळ केली व या बेकायदेशीर कर्त्यावर पांघरून घालण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप माजी आमदार कै. श्रीपतराव सोळुंके यांची नात राधिका सोळुंके (Radhika Sriram Solunke) यांनी रविवारी ता. २३ रोजी पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
1952 साली माझे आजोबा माजी आमदार कै. श्रीपतराव सोळुंके यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली असून केली असून जवळपास 40 सदस्य या कार्यकारी मंडळात होते. परंतु बहुतांश सदस्य मयत झाले आहेत केवळ आता सात सदस्य शिल्लक राहिले आहेत. सध्याच्या कार्यकारी मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना संस्थेची उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी व सचिव बंडाप्पा काळगे हे उर्वरित पाच सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असून वरिष्ठ कार्यालयाला खोट्या स्वाक्षऱ्या करून तक्रारी करत आहेत, असा आरोप त्यांनी (Radhika Sriram Solunke) यावेळी केला.
शिवाय या शिक्षण संस्थेत 2017 साली कार्यकारी मंडळाने माजी व उर्वरित तीन शिक्षकाची नेमणूक केली असताना याबाबत मी विचारणा करण्यासाठी शनिवारी ता. २२ रोजी सकाळी शाळेमध्ये गेले असता मला व माझ्या आईला मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली ‘तू कोण आहेस’ मी ओळखत नाही म्हणून शाळेच्या बाहेर हाकलून दिले मुख्याध्यापिकेने विद्यमान कार्यकारी मंडळाला डावलून उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी व सचिव बंडाप्पा काळगे यांच्या सल्ल्याने त्या मनमानी कारभार करत आहेत. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला असून यामध्ये उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी, सचिव बंडपा काळगे व मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांचा समावेश आहे.
शाळेबाबत राजकीय षडयंत्र रचले जात आहे. शाळेच्या पोषण आहारामध्येही मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर अशाच पद्धतीने त्यांनी पैसे घेऊन तीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्याच्या चौकशीही करण्याची मागणी केली आहे. नोकर भरती करत असताना पदमीनबाई सोळुंके यांच्या खोट्या सह्या करून कर्मचाऱ्यांची भरती केली असून अद्यावत बिंदू नियमावली नाही, जाहिरातीला अधीक्षकाची परवानगी कार्यकारी मंडळाला पद भरतीचा कोणताही अधिकार नाही असे असतानाही त्यांनी भरती कोणत्या निकषाधिकारी केली, याची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर या संपूर्ण बेकायदेशीर प्रकाराबद्दल मी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्याबाबत सुनावणीसाठी प्रकरण ठेवण्यात आले आहे. मला कार्यकारी मंडळांनी यापूर्वी नियुक्ती दिली आहे शिक्षणाधिकारींनी या प्रस्तावाला मान्यता न दिल्यामुळे मी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात गेले आहे. न्यायालयाने शिक्षणाधिकारी लातूर यांनी निर्णय घेण्याचे सांगितले आहे.
शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांना मारहाण केली नसून त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांचे बोगस प्रकरण दडपण्यासाठी माझ्या व माझ्या आईवर बिन बुडाचे आरोप करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदारची नात राधिका सोळुंके यांनी केली आहे. शिवाय मुख्याध्यापिकेने मलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत माझ्या गळ्यातील दागिने लंपास केले आहेत याबाबतची तक्रार निलंगा पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. अन्यथा मला न्याय नाही मिळाल्यास शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण व उपसंचालक कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा (Radhika Sriram Solunke) त्यांनी यावेळी दिला.