मुंबई (Allu Arjun Pushpa 2) : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता या (Pushpa 2) ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा पुढचा भागही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता त्याची रिलीज डेट 6 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून बराच अवधी आहे. दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे.
एकीकडे, चाहते अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) पाहण्यासाठी आतुर आहेत, तर दुसरीकडे चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन रिलीज होण्यापूर्वीच लीक झाला आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपूर्ण सेट सीन शूट करण्यासाठी सज्ज असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये केबल वायरला लटकलेली एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत आहे. मात्र, अल्लू अर्जुन या व्हिडिओमध्ये कुठेही नाही.
#Pushpa2 Climax Fight Scene 😉
Enjoy pandagowww 💥🥵😎@alluarjun #Pushpa2TheRule pic.twitter.com/EyGDhWtvzu
— Jaisai Nimmala (Allu Arjun Die Hard Fan) (@NimmalaJaisai23) July 30, 2024
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला आहे. चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की,भाऊ, हा व्हिडिओ लवकरात लवकर काढून टाका. दुसऱ्या युजरने लिहिले की, भाऊ आमचा चित्रपट खराब करू नका. एकाने लिहिले की, ‘चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन लीक करणे खूप चुकीचे होते.’
रश्मिका मंदानाने (Rashmika Mandana) ‘पुष्पा’ (Pushpa 2) या चित्रपटात (Allu Arjun) अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. आधी हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, पण चित्रपटात काही बदल केल्यामुळे आता 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेले गाणे ‘अंगारों से’ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आता या क्लायमॅक्स सीन लीक झाल्यानंतर त्याचा चित्रपटावर परिणाम होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.