हैदराबाद (Allu Arjun Remand) : ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनला आज शुक्रवारी, 13 डिसेंबरच्या सकाळी हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) अटक केली. पुष्पा 2 चित्रपटाच्या सशुल्क प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लूला आरोपी करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी (Allu Arjun) अल्लूला नामपल्ली न्यायालयात हजर केले. जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
येथे CLICK करा: अल्लू अर्जुनला अटक..! थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
दुसरीकडे अल्लूच्या (Allu Arjun) वकिलाने उच्च न्यायालयात (High Courts) जामिनासाठी अपील केले होते. त्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापनने, अल्लू अर्जुन आणि त्यांच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये BNS कलम 105 (दोषी हत्येची शिक्षा) आणि 118 (1) r/w 3 (5) (स्वेच्छेने दुखापत किंवा गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
#AlluArjun has been granted a 14 day remand and is being sent to the Chanchalguda Jail🚨 pic.twitter.com/U6ZdTLgOrO
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) December 13, 2024
दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद
सुप्रीम कोर्ट (ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड) प्रज्ञा पारिजात सिंह म्हणाल्या की, भारतीय न्यायिक संहितेच्या ज्या कलमांतर्गत पोलिसांनी अल्लूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यात 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. ही कलमे अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये येतात. अशा स्थितीत त्यांना जामीन मिळणे अवघड झाले आहे. मात्र, अल्लू उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करू शकतो. मात्र पोलिसांना अल्लूला 24 तासांच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करावे लागणार आहे. अल्लूला (Allu Arjun) न्यायालयीन कोठडी की पोलिस कोठडीत पाठवायचे हे न्यायदंडाधिकारीच ठरवतील.
Deeply heartbroken by the tragic incident at Sandhya Theatre. My heartfelt condolences go out to the grieving family during this unimaginably difficult time. I want to assure them they are not alone in this pain and will meet the family personally. While respecting their need for… pic.twitter.com/g3CSQftucz
— Allu Arjun (@alluarjun) December 6, 2024
अल्लू अर्जुन सूचना न देताच पोहोचला थिएटरमध्ये
पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुन (Allu Arjun) पोलिसांना न कळवता संध्या थिएटरमध्ये (Sandhya Theater) पोहोचला होता. त्याला पाहण्यासाठी जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच अल्लूने महिलेच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.