कृषी विभागाचे नियोजन ‘फेल’, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
अकोट (Akot) : पसंतीचे बियाणे व खत मिळविण्यासाठी गेल्या १५-२० दिक्सांपासून शेतकऱ्यांना (Farmers) सैरावैरा फिरावे लागत आहे. मात्र आजवर त्यांना आपल्या पसंतीचे बियाणे तसेच खातही मिळत नसल्याच्या व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत. शहरात काही कृषी केंद्रावर (Agricultural Center) अतिरिक्त भावात पसंतीचे बियाणे विकले जात असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. मात्र यावर कुठेच कृषी विभाग आक्रमक असल्याचे दिसत नाही यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला आहे. पेरणीचे दिवस जवळ येत आहेत. मात्र अशात शेतकऱ्याना आपल्या पसंतीचे बियाणे-खते मिळत नसल्यामूळे शेतकरी संभ्रमात दिसत आहे. आता पसंतीचे बियाणे येण्याची शक्यताही फार कमी आहे. म्हणजे यावर्षी तरी सदर बियाणे. उपलब्ध होईल, हे कोणीच सांगू शकत कृषी विभागाकडून इतर नाही. सोबत १०:२६:२६, युरिया तसेच डीएपीया खतांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आणवत आहे त्यामुळे शेतकरी संभ्रमात दिसत आहे. त्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या दुसऱ्या जातीव्या बियाण्याची व खताची खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. काही कृषी सेवा केंद्रावर हे बियाणे येत असून याची भनक कृषी विभागास लागू नये तसेच त्यांच्या स्टॉक रजिस्टरचा (Stock register) उतारा नसणे हाही चिंतनाचा विषय बनला आहे. त्यामुळेच शेतकऱ्याना १२०० ते २००० प्रति बॅग अशा अतिरिक्त भावाने खरेदी करावी लागत आहे. असले प्रकार. सांगण्यासाठी काही शेतकयांनी तालुका कृषी अधिकारी यांना कॉल केल्यास ते कॉल उचलतच नाहीत म्हणजेच झोपेचे सोग घेत तर नाहीत ना?: ? अशा संतप्त प्रतिक्रिया संबंधित अधिकाऱ्याऱ्यां बाबत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला आहे.
पेरणीचे दिवस जवळ येत आहेत. मात्र अशात शेतकऱ्यांना आपल्या पसंतीचे बियाणे-खाते (seed-account) मिळत नसल्यामूळे शेतकरी संभ्रमात दिसत आहे. खते, बियाणे खरेदी करण्याचे आवाहन
या बियाण्यांसह खताचा तुटवडा
जिल्ह्यातील सर्वत्र कपाशीचे अजित (Ajit of cotton) १५५ व अजित ५ सह, ७०६७, रेवन, बाऊन्सर, टार्गेट, कबड़ी, पंगा यासह इतरही बियाणे मिळत नसल्याने अतिरिक्त भावात शेतकरी खरेदी करीत आहेत. तसेच युरिया, १०:२६:२६, डीएपी या खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून या गंभीर बाबीवर कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.
बिल बुक, स्टॉक रजिस्टर तपासण्याची गरज
जिल्ह्यात अथवा तालुक्यात ज्या बियाण्यांचा तुटवडा जाणवत आहे त्याबाबत कृषी विभागाकडे आपल्या जिल्ह्यात किती बियाणे आले? ते कोणत्या विक्रेत्यास विल्या गेले? त्यांनी कोणात्त दिले? या व्यतिरिक्त जिल्ह्यात आणखी बाहेरून दुकानदारांनी किती बियाणे खरेदी केले? याबाबत संबंधित वरिष्ठांनी बिल बुक आणि स्टॉक रजिस्टर तपासल्यास मोठे गौडबंगाल समोर येईल, असे शेतकरी बोलत आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्याऱ्यांना सोडले वाऱ्यावर!
पसंतीचे बियाणेव खत मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. अशात तालुक कृषी विभागाने शेतकऱ्याऱ्यांना धीर देऊन कोणते बियाणे खरेदी करावे अथवा त्यांच्या जमिनीस कोणते बियाणे व खाते योग्य राहीलर कोणत्या जमिनीत कोणते बियाणे जास्त उत्पादन वाढविण्यास मदत करेल? याविषयी सूचना द्याव्यात. मात्र कृषी विभाग याबाबत कुठेच। पुढे येताना दिसत नाही. तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सुध्दा महिना महिना फिरकूनही पाहत नसल्याचे शेतकरी सांगतात.
कृषी विभागाच्या (Agriculture Department) नियोजनशून्य कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना कपाशी बियाण्यांसह खतही मिळत नाही कृषी विभाग हा झोपेचे सोंग घेऊन मुग गिळून आहे. संबंधित विभागाचे कुठेच नियोजन नसून त्यांची शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे
-डॉ. प्रशांत अढाऊ जि. प. सदस्य, अकोला