आमगाव/गोंदिया (Amagaon Acccident) : गोंदिया आमगाव देवरी राष्ट्रीय महामार्ग वरील पोवारीटोला येथे दुचाकी स्वार वाहकांनी समोर असलेल्या अल्टो कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे दाखल करण्यात आले.
आमगाव देवरी राष्ट्रीय महामार्ग वरील पोवारीटोला येथे अल्टो कार क्रमांक एमएच 42 के 9406 वाहनाला दुचाकी स्वार यांनी जबर धडक दिली. यात खेमराज शहरे मुल्ला हेटी तालुका देंवरी वय 24 अपघातात जागीच ठार झाला तर बंनंगाव तालुका आमगाव निवासी अविनाश श्यामराव हुकरे वय 23 गंभीर जखमी असून त्याला गोंदिया येथे शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या निरीक्षणात तपास सुरु आहे.