धामणगाव मतदारसंघात अमर काळेंना ९१ हजार ६३३ मते रामदास तडस यांना भोवला दहा वर्षांचा निष्क्रियपणा
देशोन्नती वृत्तसंकलन
चांदूर रेल्वे ( Chandur Railway) :- सध्या भाजपाचे वर्चस्व असणाऱ्या धामणगाव मतदारसंघात १ २ हजार नव्हे तर तब्बल १४ हजार मतांची आघाडी महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार अमर काळेनी मिळविली आहे. ही लोकसभा निवडणूक प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पुढील निवडणुकीची रंगीत तालीम म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाला विचार मंथन करण्याची वेळ सद्यास आली असून दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ येणार का.? याविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. दहा वर्षात मतदारसंघातील गावांना भेटी नाही, कुणाच्या सुख दुःखात सहभाग नाही, मोदीची गॅरंटी ( Modi’s guarantee ) सोडून विकासाचा कोणताही मुद्दा निवडणुकीत नाही, अशा अनेक कारणांमुळे वर्धा लोकसभा ( Wardha Lok Sabha ) मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. धामणगाव विधानसभा (Dhamangaon Assembly ) मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात येतो. मागील दोन लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील चादूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मतदारांनी भरघोस मतदान हे रामदास तडस याना दिले. दहा वर्षांत रामदास तडस यांची फारशी कामगिरी या मतदारसंघात पाहायला मिळाली नाही.
> रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी नागरिकांना अनेक दिवस लढा द्यावा लागला
आपल्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी व्हावे, ही किमान अपेक्षा मतदारसंघातील मतदारांची असतेः मात्र मागील दहा वर्षात तडस यांनी धामणगाव, चांदूर रेल्वे व नांदगावकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. चांदूर रेल्वे येथील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसे थे आहे. येथे रेल्वेगाड्यांच्या ( trains ) थांब्यासाठी नागरिकांना अनेक दिवस लढा द्यावा लागला. त्यामुळे याचा आक्रोश येथील मतदारांचा होता. मतदारसंघात सर्वाधिक देशमुख, मराठा, कुणबी ( Maratha, Kunbi ) या समाजासोबतच तेली समाजाचे प्राबल्य आहे. आदिवासी गोंड गोवारी, दलित, मुस्लीम या मतदारांचीही संख्या अधिक आहे; मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी रामदास तडस यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. धामणगाव मतदारसंघात अमर काळेंना ९१ हजार ६३३ मते, तर रामदास तडस यांना ७७ हजार ४१० मते मिळाली असून या मतदारसंघातून अमर काळेंना १४ हजार २२३ मतांची आघाडी मिळाली आहे.
> विकासाचा मुद्दाच होता दुर्लक्षित
धामणगाव विधानसभा ( Dhamangaon Assembly ) मतदारसंघात खा. रामदास तडस यांनी निवडून आल्यानंतर एकदाही नागरिकांच्या ज्वलंत समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मतदारसंघात कुठेही विकासकाम गतिशील झाले नसल्याने विकासाचा मुद्दा हा दूरच होता. याचा चांगलाच फटका खा. रामदास तडस यांना बसला आहे.
> केवळ प्रचारासाठी फिरकले होते मतदारसंघात
रामदास तडस यांनी निवडणुका लागताच मतदारसंघात पाय ठेवला. अन्यथा त्यांचे कायमच दुर्लक्ष राहिले,
असे मत अनेकांनी व्यक्त केले.