आद्य संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य यांना सामुहिक अभिवादन
अमरावती (Ambadaspant Vaidya) : बलिदानातून मिळालेलं स्वातंत्र्य जाेपासावं लागतं, त्यासाठी समाजाला बलशाली, निराेगी व्हावं लागतं. याच दृढ विश्वासातून राष्ट्रभक्त अंबादासपंत वैद्य (Ambadaspant Vaidya) यांनी पुढाकार घेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. भारतीय ज्ञान, संस्कृती आणि व्यायाम पद्धतीचे समाजामध्ये बिराजाराेपण केले. राष्ट्रभक्तीने ओतप्राेत असलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आज विशाल वटवृक्ष असून मंडळाच्या विशाल मैदानावर स्व. अंबादासपंत वैद्य (Ambadaspant Vaidya) यांची प्रशस्त प्रतिमा प्रत्येकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देत आहे. याच प्रेरणा स्थळावर बिगुल सलामी च्या स्वरामध्ये शिस्तबद्ध एन.सी.सी. विद्यार्थ्यांची सलामी देत जनसमुदायाने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करीत सामुहिक अभिवादन केले.
9 सप्टेंबर, स्व. अंबादासपंत वैद्य (Ambadaspant Vaidya) पुण्यस्मरण निमीत्त मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मंडळाच्या प्रेरणा स्थळ येथे सामुहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांतराव चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डाॅ. विकास काेळेश्वर, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. वसंतराव हरणे, वामनराव तायडे, हिम्मतराव घाेम, रमेशराव दुबे, खराते, प्रदिपराव पिंपळकर, दिपाताई कान्हेगावकर, प्रा. प्रणव चेंडके आदींच्या उपस्थितीमध्ये अभिवादन साेहळ्याची सुरूवात झाली. सर्वप्रथम मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे हस्ते दादाजींच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करण्यात आले. यानंतर मंडळाचे सर्व पदाधिकारी व उपस्थित जनमुदायाने प्रेरणास्थळावर पुष्प अर्पण करीत स्व. अंबादासपंत वैद्य (Ambadaspant Vaidya) यांना अभिवादन केले.
या अभिवादन साेहळ्याला डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे विभागप्रमुख डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. संजय तिरथकर, डाॅ. विजय पांडे, डाॅ. जयंत इंगाेले, डाॅ. देवानंद सावरकर, डाॅ. दिनानाथ नवाथे, डाॅ. उदय मांजरे, डाॅ. सुनील लाबडे, डाॅ. संजय लाबडे, डाॅ. शितल काळे, डाॅ. शिला ठाकरे, डाॅ. अनिता गुप्ता, डाॅ. किरण गायकवाड, डाॅ. शालीनी देवडे, प्रा. जया देशमुख, प्रा. श्रद्धा द्विवेदी, प्रा. संजय गाेहड, रासेयाे प्रमुख प्रा. वैभव बनकर, प्रा. सुनील पिंपळे, प्रा. प्रसाद ताेटे, प्रा. विठ्ठल टाेले, डाॅ. निलेश जाेशी, प्रा. राजेश पांडे, प्रा. संजय इंगळे, डाॅ. संजय मडावी, डाॅ. महेंद्र लाेणकर, प्रा. राहुल भालेराव, डाॅ. ललीत शर्मा, प्रा. सुनील जाेशी, प्रा. अमृता साई, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. अंजली राऊत यांचेसह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रभावी संचलन डाॅ. विजय पांडे यांनी केले. दादाजींच्या जीवन कार्याची माहिती प्रा. आशिष हाटेकर यांनी उपस्थितांना दिली.
राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्या ! : पद्मश्री प्रभाकरराव वैद्य
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य (Ambadaspant Vaidya) यांचे पुण्यस्मरण म्हणजे, राष्ट्रभक्तीचा प्रज्वलती करणारा क्षण. केवळ स्वत:साठी न जगता या देश आणि समाजहितासाठी आपल्या सर्वांचे याेगदान अपेक्षीत आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्याची कास धरतांना देशाच्या विकासासाठी याेगदान कसे देता येईल याचे चिंतन आणि ध्येय जाेपासावे. स्व. अंबादासपंत वैद्य यांनी आयष्यभर देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता समर्पीत आयुष्य जगले. आज त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतांना प्रत्येकाने स्व. अंबादासपंत वैद्य (Ambadaspant Vaidya) यांच्या आदर्श व्यक्तीत्वाचा बाेध घेत राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे अवाहन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी केले.