बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांचीही उपस्थिती!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील (Ambadevi Mahaarti) अंबादेवी संस्थान श्रीक्षेत्र तारापूर येथे नवरात्री उत्सवाच्या निमित्याने सोमवार ६ ऑक्टोबर रोजी आदिशक्ती अंबादेवीची धर्मवीर आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)( यांनी सहकुटुंब महाआरती करून मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्याठिकाणी सोबत (Buldhana Urban) बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak), राजेश देशलहरा, माजी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, सौ.मयुरी मृत्युंजय गायकवाड, वसुंधरा पृथ्वीराज गायकवाड, धर्मवीरा मृत्युंजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यासह तारापूर सरपंच प्रवीण जाधव, गणेश बस्सी यांच्यासह मोताळा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच तारापूर मंदिर संस्थानाचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर भाविकभक्त उपस्थित होते.