बुलडाणा (Ambani Wedding) : भारतातच नव्हे तर जगभर गाजत असलेल्या अंबानी परिवारातील विवाह सोहळ्यात केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी सपत्नीक म्हणजे सौ. राजश्री जाधव यांच्यासह उपस्थिती लावली, यावेळी त्यांच्यासमवेत मेहकरचे आमदार संजय रायमूलकर हेही सपत्नीक म्हणजे सौ. रंजना रायमूलकर यांच्यासह उपस्थित होते.
श्रीमंतांच्या यादीत जगभरातून टॉप टेनमध्ये असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची सुपुत्र अनंत यांचा विवाह मर्चंट परिवारातील राधिका यांच्याशी शुक्रवार 12 जुलै रोजी पार पडला, या (Ambani Wedding) सोहळ्यासाठी जगभरातून सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री म्हणून ना. प्रतापरावांनाही सहपरिवार आमंत्रण होते. त्यामुळे त्यांनी या सोहळ्यासाठी सौ. राजश्रीताई जाधव यांच्यासह उपस्थिती लावली.
अंबानी परिवाराने देशभरातील लोकप्रतिनिधींना आणि सेलिब्रिटीला विवाहाची निमंत्रण पत्रिका पाठविली होती.चांदी व आत सोनं असलेल्या मुर्त्या अशी लाखो रुपयांची आकर्षक व जगावेगळी निमंत्रण पत्रिका आणि विशेष म्हणजे त्यावर लोकप्रतिनिधीसह त्यांच्या पत्नीच्या नावाने लग्नपत्रिका पाठविण्यात आली होती. हीच पत्रिका प्रतापरावांनाही पाठविण्यात आली होती. त्यामुळे या (Ambani Wedding) सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व नीता अंबानी यांनी स्वागतही केले.
याविवाह (Ambani Wedding) सोहळ्याला हॉलिवूड-बॉलिवूड चे सर्वच तारक-तारका सहपरिवार हजर होते. बच्चन कुटुंबापासून तर शाहरुख- सलमान आणि दक्षिणेतील रजनिकांतसह आदी हजर होते. त्या विवाहसोहळ्यात ना .जाधव आणि आ. रायमूलकर यांची सहपरिवार हजेरी चांगलीच चर्चेची ठरली. यावेळी ना. अजितदादा, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, रणबीर कपूर, ऋतिक रोशन, क्रिक्रेटविर सूर्यकुमार यादव, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, खा श्रीकांत शिंदे आदींची भेट झाल्याचे आ. संजय रायमूलकर यांनी सांगितले.