परभणी/गंगाखेड (Bharat Bandh) : सुप्रीम कोर्टाच्या संविधान विरोधी निर्णया विरोधात एस.सी.,एस. टि.च्या संरक्षणासाठी दि. २१ ऑगस्ट बुधवार रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला (Bharat Bandh) गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत गंगाखेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालाने एस.सी., एस. टि. विरुद्ध दिलेल्या निर्णयाविरुद्ध देश भरात संतापाची लाट आली असून दि. २१ ऑगस्ट मंगळवार रोजी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांनी गंगाखेड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांची भेट घेवून (Bharat Bandh) भारत बंदला पाठिंबा असल्याचे निवेदन सादर केले. यावेळी इंजि. सुरेश फंड, डिगाबर घोबाळे, मनहोर व्हावळे, विकास रोडे, सचिन कांबळे, प्रतिक साळवे, संतोष हानवते महाविर घोबाळे, भिमराव कांबळे, लखन अण्णा साळवे, बाळू पारवे, साधू घनसावंत, संभाजी साबणे, अविनाश जगतकर, रोहिदास लांडगे, अनिल साळवे, रमेश जोंधळे, पंडित पारवे आदींसह बहुसंख्य आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.