परभणी (Parbhani):- सामाजिक न्यायाने मिळालेले आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी ओबीसींचे (OBC)आमदार निवडूण द्यावे लागतील. त्यासाठी आंबेडकरी जनतेने त्यांच्या पाठिशी राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे परभणीत प्रतिपादन
ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त परभणी येथे अक्षदा मंगल कार्यालयात आयोजीत स्वागत समारंभा प्रसंगी अॅड. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उप महापौर भगवानराव वाघमारे, प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्य श्रीमती रेखाताई ठाकूर यांची उपस्थिती होती. तसेच स्वराजसिंह परिहार, अविनाश भोसीकर, रमेश बावीसकर, गोविंद दळवी, नागोराव पांचाळ, डॉ. धर्मराज चव्हाण, विशाल बुधवंत, सुनील मगरे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करत आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला ओबीसी समाजाचे नेते नानासाहेब राऊत, चंद्रकात बोकन, राजेंद्र वडकर, कृष्णा कटारे, अविनाश काळे, राजाभाऊ नागरे, राजाभाऊ घुगे, बी.डी. चव्हाण, सुनील मगरे, तुकाराम भारती, तुषार गायकवाड, सुमित भालेराव, प्रमोद कुटे, रणजीत मकरंद, सुनीताताई साळवे, दिलीप मोरे, धम्मपाल सोनटक्के, सुमित जाधव, विठ्ठल तळेकर, गौतम रणखांबे, शिवाजीराव वाकले, दादाराव पंडित, संदीप खाडे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी लखन सौंदरमल, अक्षय भुजबळ, अविनाश सावंत, बालाजी पाईकराव, सुनील सोनवणे, दिपक पंचांगे यांच्यासह परिश्रम घेतले.