डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली धमकी
वाशिंग्टन (America china tariff war) : अमेरिका आणि चीनमधील ‘टॅरिफ वॉर’ तीव्र झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी चीनला धमकी दिली की, जर त्यांनी 8 एप्रिल 2025 पर्यंत अमेरिकन निर्यातीवर लादलेला 34% प्रत्युत्तरात्मक कर मागे घेतला नाही तर ते 9 एप्रिलपर्यंत चीनवर 50 टक्के नवीन कर लादतील. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘ट्रुथ सोशल’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जर चीनने आज 08 एप्रिल 2025 पर्यंत व्यापार गैरवापरावरील 34 टक्के कर मागे घेतला नाही, तर (America china tariff war) अमेरिका 9 एप्रिलपासून चीनवर 50 टक्के कर लादणार आहे.”
The United States has a chance to do something that should have been done DECADES AGO. Don’t be Weak! Don’t be Stupid! Don’t be a PANICAN (A new party based on Weak and Stupid people!). Be Strong, Courageous, and Patient, and GREATNESS will be the result!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 7, 2025
‘34% कर हटवा नाहीतर 50% नवीन कर लादणार’
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुढे म्हणाले की, “याव्यतिरिक्त, चीनसोबतच्या आमच्या बैठकांसाठी विनंती केलेल्या सर्व वाटाघाटी रद्द केल्या जातील! बैठकांची विनंती करणाऱ्या इतर देशांशीही वाटाघाटी त्वरित सुरू होतील. या (America china tariff war) प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने सांगितले होते की, 9 एप्रिलपासून अमेरिका चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के कर लावेल. यानंतर, चीनने आपल्या वतीने अमेरिकेवरही असाच टॅरिफ कर लादण्याची घोषणा केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणांचे केले समर्थन
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही त्यांच्या टॅरिफ धोरणांचे समर्थन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, जगभरातील देश अमेरिकेशी बोलत आहेत. या संभाषणासाठी एक योग्य मानक निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार त्यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती ट्रम्प (Donald Trump) यांनी दिली आहे. तथापि, त्यांनी असेही म्हटले की, (America china tariff war) जपानने व्यावसायिक बाबतीत अमेरिकेशी खूप वाईट वागणूक दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते आमची एकही कार खरेदी करत नाहीत पण, आम्ही त्यांच्या लाखो कार खरेदी करतो. शेती आणि इतर उत्पादनांचीही अशीच परिस्थिती आहे.