America: अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ला राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी घोषित केलेल्या तीन टप्प्यांच्या योजनेला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. यामुळे गाझामध्ये जवळपास आठ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबेल आणि सर्व ओलीसांची सुटका करणे आणि उद्ध्वस्त झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात मदत पाठवणे सोपे होईल.पण या युद्धात हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने इस्रायलने गाझामध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत.
रात्रभर झालेल्या हल्ल्यात अकरा पॅलेस्टिनी ठार झाले.
7 ऑक्टोबर 2023 पासून युद्धात 36,550 पॅलेस्टिनी (Palestinian) मारले गेले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड (Linda Thomas-Greenfield) यांनी सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये हमासच्या अचानक हल्ल्यामुळे सुरू झालेला संघर्ष संपवण्यासाठी आम्ही परिषदेच्या इतर 14 सदस्यांना ठरावाचा मसुदा पाठवला आहे. अनेक नेत्यांनी आणि सरकारांनी (government) या योजनेला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सुरक्षा परिषदेला (conference) हा करार विनाविलंब आणि अटींशिवाय लागू करण्यात सहभागी होण्याचे आवाहन करतो. हमासनेही ते मान्य केले, पण इस्रायलने ते स्वीकारल्याचे ऐकिवात नाही. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र (United Nations) मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनीही युद्धविराम कराराला पाठिंबा दर्शवला आहे.