नदी,नाल्ये झाले बनले सेल्फी पॉईंट
आमगाव (Amgaon flood) : तालुक्यातील नदी नाल्यांना पुरानी वेढले असून त्या ठिकाणी नागरिकांकडून सेल्फी काढण्याच्या धुंदीत जिव धोक्यात घालत आहेत. प्रशासन मात्र अनभिझं आहे. आज आलेल्या पुराचा वेढा (Amgaon flood) बघायला बघ्यांची गर्दी उसळून वाहत आहे मात्र बऱ्याच ठिकाणी दुपार पर्यंत ब्यारिकट लावले नाहीं तसेच पोलीस बंदोबस्त दिसून येते नव्हते,त्यामुळे सालेकसा रोड वरील पुरात नागरिकांत सेल्फी व मस्ती करण्यात होळ लागली होती.
आमगाव तालुक्यातील लांजी रोड या ठिकाणी सकाळ पासूनच पोलिसांचा चोखबंदोबस्त होता. या ठिकाणी मध्यप्रदेश कडे मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाश्यांची कमालीची दमछाग झालेली दिसून आली. किडनंगीपार रोड वरील जवरी, शिवनी, चिरचाळबांध मार्ग बंद पडले, तसेच महारीटोला, संभूटोला, मुंडीपार, नणसरी, व कारंजा, कुल्पा, सालेकसा, साखरीटोला, झालिया आणि इतर नदीपात्रा जवळील रस्ते पुराच्या वेढ्यात असल्यामुळे रस्ते बंद झाले त्यामुळे सकाळी आले विधार्थी, दूध विक्रते,मजूर यांना (Amgaon flood) आमगाव येथेच मुक्काम करावे लागले.