औशात गरजले काँग्रेसचे स्टार प्रचारक अमित देशमुख
औसा (Amit Deshmukh) : औशात विकासाच्या आड काय चाललंय? असा सवाल करून सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवा, असे जोरदार आवाहन करीत औशातून सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, आपला माणूस, आपल्या अडचणीला धावून येणारा माणूस व सर्वसामान्यांचे प्रतिबिंब असलेला माणूस अर्थात दिनकर माने ५० हजार मतांनी विजय होतील, असा दावा काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केला.
औसा येथे शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, खा. ओमराजे निंबाळकर, खा. शिवाजीराव काळगे माजी खासदार सुधाकर शृंगारे, उमेदवार दिनकर माने शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी दिनकर माने यांच्यावर आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारचा पायाच भ्रष्टाचारातून उभारलाय, असा आरोप करून महायुतीतील नेते सर्वसामान्यांच्या विकासासाठी नव्हे, तर ‘निधीसाठी एकत्र आलो’, असे सांगतात, असे सांगून आम्ही देशमुख म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. (Maratha Samaj) महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा धुळीत मिळविण्याचे काम महायुतीने केले. एखाद्याशी नाही पटले तर जनतेमध्ये जाऊन निवडून येऊन सरकार स्थापन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र महायुतीने फोडाफोडीच्या संस्कृतीला चालना दिली, हे लोकांनी मान्य केले नाही. लोकसभेत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, तिथेच महायुती सरकारच्या शेवटच्या घटका सुरू झाल्या, अशी टीकाही (Amit Deshmukh) त्यांनी केली.
मराठवाड्यात लोकसभेच्या 8 पैकी 7 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, विधानसभेला 46 पैकी 46 जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. दिनकर माने हे लोकनेते विलासराव देशमुख यांचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी माने यांचा विजय निश्चित आहे. त्यांचा विक्रमी मतांनी विजय नोंदवावा, असे आवाहन (Amit Deshmukh) त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
बाह्यवळण रस्ता न्यायचा कुठून..?
लातूर ऊन कधी निघालो की, औसा येथे उड्डाणपूल नसल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. उड्डाणपूल व्हावा, म्हणून गडकरींना पत्र पाठविले; परंतु उड्डाणपूल झाला नाही. उड्डाणपूल करायचा नाही, बाह्य वळण रस्ता करायचा… मात्र तो अजून झाला नाही… तो बाह्यवळण रस्ता कुठून न्यायचा? याचाही निर्णय झाला नाही, असे म्हणत विद्यमान आमदारांवर त्यांनी सडकून टीका केली. स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून इथल्या लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य माणसांची अडचण केली, असा आरोप (Amit Deshmukh) अमित देशमुख यांनी केला