नवी दिल्ली (Amit Shah) : भाजपच्या नेतृत्वाखालील (NDA) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज (Narendra Modi) नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यामुळे त्यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी, 9जून रोजी शपथविधी होणार आहे. NDAकडे 293 खासदार आहेत, जे 543 सदस्यांच्या लोकसभेत बहुमताच्या 272 च्या वर आहेत. भाजपने 543 पैकी 240 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 99 जागा जिंकल्या. लोकसभेत 543 सदस्य असूनही सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीनंतर 542 जागांसाठी मतमोजणी झाली.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान
भाजपला 272 बहुमताचा आकडा कमी पडला असला तरी, सरकार स्थापन करण्यासाठी ते (NDA) एनडीएच्या मित्रपक्षांवर अवलंबून असेल. निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या नेतृत्वाखालील (NDA) एनडीएला अपेक्षेप्रमाणे किंवा एक्झिट पोलच्या संकेतानुसार मोठा विजय मिळवून दिला नाही.
#WATCH | Union HM Amit Shah says "I congratulate everyone for winning the Lok Sabha Elections again. Defence Minister Rajnath Singh has proposed the name of Narendra Modi as the leader of Lok Sabha, leader of the BJP and NDA Parliamentary Party. I wholeheartedly support this…" pic.twitter.com/gUlZvOxDr4
— ANI (@ANI) June 7, 2024
संसदीय पक्षाच्या बैठकीत अमित शाह काय म्हणाले?
संसदीय पक्षाच्या बैठकीदरम्यान राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदीय पक्षाचे नेते म्हणून (Narendra Modi) नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांची औपचारिकपणे संसदीय दलाच्या नेत्याची निवड करण्यात आली. दरम्यान, भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकसभा सभागृहाचे नेते, भाजप संसदीय पक्षाचे नेते आणि NDA संसदीय पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. हा प्रस्ताव 140 कोटींच्या देशातील जनतेच्या मनाचा कथन आहे. 60 वर्षांनंतर कोणीतरी तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होणार आहे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ कधी घेणार?
मिळालेल्या माहितीनुसार, NDA नेते आजच राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. माहितीनुसार, 9 जून 2024 रोजी संध्याकाळी शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सध्या कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.