सुमारे 79 हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित !
अमरावती (Amravati) गतवर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा (Crop insurance) काढलेल्या जिल्ह्यातील सुमारे ७९ हजार शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा रकमेचा लाभ (Farmers still benefit crop insurance amount) मिळाला नाही. वर्षभरापूर्वी मंजूर पीकविम्याचा १२३ कोटींचा परतावा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकलेला नाही. शासनाने हा निधी कंपनीला देण्यास १ मार्चला मान्यता (Approval to release funds to the company on 1st March) दिल्याने बाधित शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळणार असल्याचे (Crop insurance to farmers) कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, आजघडीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, (Cotton, soybeans,) तूर, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात मेळघाट वगळता १२ तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली शिवाय ८६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे १.२५ लाख शेतकऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजेच ७२ तासांच्या आत कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. या अर्जाची कंपनी स्तरावर पाहणी करण्यात आली. त्या तुलनेत ९४ हजार ६६४ शेतकऱ्यांना ९८.८६ कोटींचा परतावा पीकविमा कंपनीव्दारा देण्यात आला; मात्र योजनेत परताव्याचे प्रमाण ११० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने उर्वरित निधी शासनव्दारा पीकविमा कंपनीला देय आहे. त्यानुसर शासनाने मान्यता दिली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे कृषी विभागाकडून
नुकसानीच्या तुलनेत भरपाई घेणारे शेतकरी कमीच
शेतकऱ्यांना नैसर्गिक (Natural to farmers) आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. (Pradhan Mantri Crop Insurance Scheme implemented) देशभरातील शेतकरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीकविमा योजनेत सहभागी होतात; मात्र, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील ७९ हजार शेतकरी पीकविम्याचा लाभापासून वंचित आहे. आज घडीला या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही.
-प्रवीण मोहोड,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
त्रुटीमुळे काही शेतकरी वंचित
काही अर्जामध्ये त्रुटी असू शकतात. त्यामुळे काही शेतकरी वंचित असेल, त्यांनाही लवकरच लाभ मिळेल. चौकशी करण्यात येईल.
– राहुल सातपुते
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी