केंद्रीय राखीव पोलीस फोर्सच्या पोलीस व्हॅनला ट्रकची धडक
धामणगाव रेल्वे (Amravati Accident) : निवडणूक कर्तव्य बजावून बीड येथून गडचिरोली परत जात असतांना (Central Police) केंद्रीय राखीव पोलीस फोर्स व्हॅनला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका पोलीस जवानाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा गुरुवारला दुपारच्या सुमारास (Samriddhi Highway accident) समृद्धी महामार्गावर चैनल क्रमांक १४७ वर सुलतानपूर गावासमोर झाला. अपघातग्रस्त पोलीस व्हॅन मध्ये जवळपास १८ ते २० केंद्रीय राखीव पथकाचे पोलीस प्रवास करीत होते.
निवडणूक कर्तव्य बजावून बीड येथून गडचिरोली परत जात असतांना केंद्रीय राखीव पोलीसाचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक कर्तव्य बजावून केंद्रीय राखीव पोलीस फोर्सचे पोलीस बीड येथून गडचिरोली येथे पोलीस व्हॅनने परत जात होते. गुरुवारला (ता.६) दुपारच्या सुमारास समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway accident) चैनल क्रमांक १४७ वर सुलतानपूर गावासमोर रस्त्याच्या बाजूला पोलीस व्हॅन उभी केली. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने व्हॅनला धडक दिल्याने यात पोलीस जवान तेजस राव यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान या ठिकाणावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अपघात बघताच गंभीर असलेल्या (Central Police) जवानांना आपल्या गाडीमध्ये टाकून (Amravati Hospital) ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचाराकरिता आणले. यामध्ये गिरीश कुमार हे गंभीर जखमी असून तेजस राव यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमींना (Yavatmal Hospital) यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.