अमरावती (Amravati Assembly) : भारतीय जनता पार्टी एकाही मुस्लिमाला उमेदवारी देत नाही किंवा (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात एकही मुस्लिम मंत्री नाही म्हणून आमच्या नावे बोंब ठोकणाऱ्या काँग्रेसने त्यांना (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकीत सहज विजय मिळवून देणाऱ्या मुस्लिम समाजास विधानसभा निवडणुकीत अमरावतीतून उमेदवारी देऊन त्या समाजाला न्याय द्यावा, असे आव्हान (BJP) भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivarai Kulkarni) यांनी दिले आहे.
विजयात निर्णायक भूमिका असलेल्या मुस्लिमांना काँग्रेसने अमरावतीची उमेदवारी द्यावी
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) देशात सलग तिसऱ्यांदा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी काँग्रेस आपणच विजयी झाल्याच्या अविर्भावात वागत आहे. काँग्रेसच्या ज्या काही थोड्याफार जागा वाढल्या किंवा देशभर जी काही थोडीफार मतांची टक्केवारी वाढली त्याचे संपूर्ण श्रेय मुस्लिम समाजाला जाते. अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे खरे हक्कदार मुस्लिम मतदार आहेत. त्यातही (Amravati Assembly) अमरावती विधानसभा मतदारसंघात मिळालेली आघाडी निर्णायक आहे. अमरावतीत काँग्रेसला मिळालेल्या विक्रमी व निर्णायक आघाडीचे संपूर्ण श्रेय मुस्लिमांचे आहे.
‘मोहब्बत की दुकान’ सिद्ध करा
काँग्रेसचे नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांपेक्षा मुस्लिम समाजाचे योगदान मोठे आहे. निवडणुकीत मतदार बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने पाठवलेले पैसे परत करून मुस्लिम समाजाने ‘चंदा’ जमा करून आपले कर्तव्य पार पाडले. काँग्रेसच्या अनुभवावरून आम्ही नेहमीच सांगत असतो की काँग्रेस मुस्लिमांचा वापर केवळ व्होट बँक म्हणून करते. BJP भाजपा मुस्लिम विरोधी आहे असा नरेटिव्ह पसरवून त्यांची गठ्ठा मतं मिळवून जिल्ह्यातील काँग्रेस नेते स्वतःची पोळी शेकून घेतात. खा. बळवंत वानखडे विजयी झाल्यावर त्यांच्या विजयाचे श्रेय मुस्लिम समाजाला न देता काँग्रेस नेते स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत. आम्हाला मुस्लिम विरोधी ठरवणाऱ्या काँग्रेसने आजवर कधीही अमरावती विधानसभेची उमेदवारी मुस्लिमांना दिलेली नाही. त्यांचा गठ्ठा मतदानासाठी व्होट बँक म्हणून वापर करून घेतला. उलट आम्ही जनता पार्टीचे घटक असताना 1978 साली ऍड. मुनिर खान उस्मान खान यांना उमेदवारी दिली होती. मुस्लिमांच्या मतांवर विजय मिळवायचा आणि निवडणुकीत आपल्या नेत्यांची दुकानदारी चालवायची काँग्रेसची मानसिकता आहे.
लोकसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात (Amravati Assembly) 1 लक्ष 99 हजार 242 मतदारांनी मतदान केले. पैकी काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना 1 लक्ष 14 हजार 702 एवढे विक्रमी मतदान झाले. यात अर्ध्याहून अधिक वाटा मुस्लिम समाजाचा आहे. नवनीत राणा यांना फक्त 73 हजार 361 मते मिळाली. अमरावती विधानसभा मतदारसंघात 64 हजाराहून अधिक मते मुस्लिमांनी काँग्रेसला दिली. हमखास निवडून येईल अशा ठिकाणी प्रियांका वाडरा आणि पडणाऱ्या ठिकाणी मागासवर्गीय के सुरेश असे ‘मोहब्बत की दुकान’ न चालवता मुस्लिमांना न्याय देऊन दाखवण्याचे आव्हान (Shivarai Kulkarni) शिवराय कुळकर्णी यांनी केले आहे.