जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती
अमरावती (Amravati Assembly Elections) : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज (Amravati Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीच्या वतीने मागण्यात आले होते. या अंतर्गत 24 उमेदवारांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी करता अर्ज दाखल केलेले आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक 13 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.
दर्यापूर मतदारसंघात सर्वाधिक 13 इच्छुकांची गर्दी
आगामी (Amravati Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले असताना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील इच्छुक उमेदवारांचे अर्ज 11 जुलैपासून मागण्यात आले होते. याकरिता त्यांच्याकडून पक्ष शुल्क देखील स्वीकारण्यात आलेले आहे. या अंतर्गत एकूण 24 उमेदवारांनी सहा विधानसभा मतदार संघात उमेदवारांचे अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. यामध्ये विद्यमान आमदार व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघातून, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा अचलपूर मतदारसंघातून तर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
यासह दर्यापूर मतदारसंघातून रामेश्वर अभ्यंकर, सुधाकर तलवारे, विजय जोंधळेकर, अरुण वानखडे, अमित मेश्राम, विजय विलेकर,रमेश सावळे,सागर कलाने, चंद्रशेखर खंडारे, आशा अघम, नितेश वानखडे, गुणवंत देवपारे, प्रवीण मनोहर, मेळघाट मतदार संघातून दयारामजी काळे,हे मंत चीमोटे, रविकुमार पटेल, राम चव्हाण, मन्ना दारसिंबे, रमेश तोटे, वरुड मोर्शी मधून गिरीश कराळे व हेमंत सोनारे, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.