आ. सुलभाताई खोडके यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दर्शविली सकारात्मकता
अमरावती (Amravati Bus Stand) : मागील ७० वर्षांपासून प्रवाश्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या (Amravati Bus Stand) अमरावती मध्यवर्ती बस स्थानक व एस.टी.आगाराला सद्या घर-घर लागली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पुर्नबांधणी व विस्तारीकरणाचा प्रस्ताव मान्य करण्याला घेऊन अमरावतीच्या आ. सुलभाताई संजय खोडके (Sulbhatai Khodke) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना पत्राद्वारे अवगत केले. येत्या पावसाळी अधिवेशनात सदर प्रस्तावास मंजुरी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्रीमहोदयांनी आश्वस्त केले आहे. (Amravati Bus Stand) अमरावती मध्यवर्ती बस स्थानक व एस.टी.आगाराला सद्या घर -घर लागली आहे. इमारत जुनी झाली असून क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गांवर आहे. त्याठिकाणी स्वच्छता नसून प्रसाधन गृह व अन्य सुविधांची सुद्धा व्यवस्था ही जुनीच असून मोडकळीस आली आहे. पावसाच्या दिवसात बसस्थानकाला गळती लागत असून विद्यार्थी , महिला व प्रवाश्यांना गैरसोय सहन करावी लागते आहे.
त्याअनुषंगाने अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व आगाराची पुर्नबांधणी तसेच तेथे सुरक्षित प्रवासीसेवा व चालक- वाहक व कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता आदी बाबींना घेऊन अमरावतीच्या आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी गेल्या २६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहणी केली होती. सद्यस्थितीत अमरावती एस.टी. आगार व बसस्थानक हे जवळपास साडेतीन एकर जागेत आहे. त्यामुळे तेथील गॅरेज (वर्कशॉप ) व (Amravati Bus Stand) मध्यवर्ती बसस्थानक असे दोन भाग मिळून एक सुसज्य व प्रशस्त नवीन बसस्थानकाची पुर्नबांधणी व विस्तार करणे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेला व सुविधेला घेऊन आवश्यक आहे. याबाबत १४.५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता . तसेच अमरावती मध्ये तपोवन- विद्यापीठ भागात एक गॅरेज (वर्कशॉप ) आहे. त्याठिकाणी एसटी बस चे गॅरेज कायम ठेवून तेथूनच दुरुस्तीचे कामे सुरळीत ठेवण्याबाबत सुद्धा ७ ते १० कोटींचा निधी लागणार आहे.
दरम्यानच्या काळात त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने गेल्या १९ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी लक्षवेधी सूचना मांडून सभागृहात चांगल्याच आक्रमक पवित्रा घेतला होता. अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच बसस्थानकावर वाढती प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता त्याठिकाणचे विस्तारीकरण व अत्यंत प्रशस्त व सर्व सुविधांनी सुसज्ज असे बसस्थानक होऊ शकते, तसेच चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा चांगल्या सुविधा निर्माण करता येऊ शकतात. म्हणून सदर चा प्रस्ताव कधी मान्य करणार ? असा प्रश्न आ. सुलभाताई खोडके (Sulbhatai Khodke) यांनी विधान भवनात उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना तत्कालीन परिवहन मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले होते की,सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्या नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आंचार संहितेमुळे सदर प्रक्रिया रखडली असतांना आता आ. सुलभाताई खोडके (Sulbhatai Khodke) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना पत्र देऊन अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणी व विस्तारीकरणासाठीचा प्रस्ताव शासनाने मान्य करण्यासंदर्भात विनंती केली आहे. यावर उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मका दर्शविली असल्याने येत्या काही दिवसात त्यास मंजुरी मिळणार आहे. (Amravati Bus Stand) अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व आगार च्या पुनःबांधणी व विस्तारीकरणाच्या १४.५० कोटींच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याने बसस्थानकाचे रुपडे पालटणार असून प्रवासी व चालक -वाहक कर्मचाऱ्यांना चांगली सोय होणार आहे.